FASTag | फास्टटॅगची झंझट संपणार, आता असा वसूल करणार टोल!

FASTag | आता टोल नाक्यावर फास्टटॅगची ही झंझट संपणार आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगापासून वाहनधारकांची मुक्ती करण्यासाठी नितीन गडकरी यांनी या नवीन पद्धतीची माहिती दिली आहे.

FASTag | फास्टटॅगची झंझट संपणार, आता असा वसूल करणार टोल!
टोल वसुलीचा नवीन प्रयोगImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 10:44 AM

FASTag | देशातील वाहनधारकांना टोल नाक्यावर (Toll Plaza) दिलासा मिळणार आहे. फास्टटॅगची (FASTag) झंझट लवकरच संपणार आहे. टोल नाक्यावर लांबच लांब रांगापासून वाहनधारकांची सूटका करण्यासाठी आणखी एक प्रयोग राबवण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील (National Highway) टोल नाके सरकार गुंडाळण्याच्या तयारीत आहेत. अर्थात तुमची टोलमधून मुक्ती होणार नाही. मात्र टोल नाके हटवून आता थेट दुसऱ्या मार्गाने टोल वसूली करण्यात येणार आहे. ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेऱ्यांनी (Automatic Number Plate Reader Camera) हे काम करण्यात येणार आहे. वाहनांच्या नंबर प्लेटवरुन आता तुमच्या खात्यातून टोलची रक्कम वळती होणार आहे. याची माहिती केंद्रीय भूपृष्टीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी याविषयीची माहिती दिली. त्यामुळे वाहनधारकांना फासस्टॅग स्टीकर गाडीवर लावण्याची गरज राहणार नाही. अर्थात ही प्रणाली कधीपर्यंत अंमलात आणणार यांची माहिती मात्र देण्यात आलेली नाही.

खात्यात रक्कम कपात

बिझनेस स्टँडर्डने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, सध्या टोल नाक्यांवर फास्टटॅग अथवा रोख स्वरुपात टोलची रक्कम वसूल केल्या जाते. यापुढे ही प्रक्रिया संपुष्टात येईल. ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेऱ्यांद्वारे टोल वसुलीचे काम करण्यात येणार आहे. कॅमेरे या स्वयंचलीत पद्धतीने नंबर प्लेट रीड करतील आणि टोलची रक्कम आपोआप तुमच्या बँकेच्या खात्यात कपात होईल. या प्रकल्पावर सध्या काम सुरु असून लवकरच ही नवीन प्रणाली राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात येणार असल्याची माहिती भूपृष्टीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. एवढ्यावरच न थांबता ही प्रणाली लागू करण्यासाठी कायद्यात सुधारणही करण्याचे संकेत गडकरी यांनी दिली.

पैसा तर नाही पण वेळ नक्की वाचणार

टोल नाके संस्कृती मोडीत काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत नुकतीच घोषणा केली. टोल नाके सत्ताधाऱ्यांच्या तुंबड्या भरण्याची दुकाने असल्याचा आरोप त्यांनी केला. नितीन गडकरी यांनी ही यापूर्वी देशभरातील टोल नाका संस्कृती हटवण्याची वकिली केली होती. त्यानुसार, टोल नाके मोडीत काढण्यासाठी आता ही नवीन प्रणाली आणण्यात येत आहे. ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेरा प्रणालीद्वारे ही काम करण्यात येणार आहे. गडकरी यांच्या दाव्यानुसार, ही प्रणाली लागू करण्यासाठी काही तांत्रिक समस्या पुढे येत असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. नंबर प्लेटवर व्यवस्थित आकडे दिसले नाही. नंबरऐवजी दुसरे शब्द लिहिल्यास कॅमेरा ते रीड करु शकणार नाही आणि टोल कपात होणार नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचा ही विचार करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

FASTag मधून 97 टक्के वसूली

सध्या देशभरात जो टोल वसूल करण्यात येत आहे. त्यातील 97 टक्के टोलची वसुली ही FASTag च्या माध्यमातून होत असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच फास्टटॅगमुळे टोल नाक्यावरील लांबच लांब रांगामधून ही वाहनधारकांना कमी वेळ लागत आहे. परंतु, वेळेत म्हणावी तशी बचत होत नसल्याचे समोर आले आहे. देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील टोलमधून 40,000 कोटी रुपयांचे उत्पन्न सरकारला झाले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.