Maruti 800 : फक्त 47 हजार 500 रुपयांची Maruti 800 आता 39 वर्षानंतर कशी दिसते पाहा..

Maruti 800 : मारुती 800 ही सर्वसामान्य नागरिकांची एकेकाळी श्रीमंती होती, या कारचे 39 वर्षांपूर्वीचे पहिले मॉडेल असे दिसत होते..

Maruti 800 : फक्त 47 हजार 500 रुपयांची Maruti 800 आता 39 वर्षानंतर कशी दिसते पाहा..
मारुतीच्या पहिल्या कारचा लूक असा की..Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 2:50 PM

नवी दिल्ली : मारुती देशातील सर्वात मोठी कार निर्माता (Car Manufacturer) आणि विक्री करणारी कंपनी आहे. या कारला भारतीयांमध्ये मोठी मागणी आहे. ऑल्टो 800 (Alto 800) कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. ही कार मारुती 800 (Maruti-800) ची आठवण करुन देते. मारुती 800 ही कंपनीची पहिली कार होती. ही कार त्याकाळी श्रीमंतीचं लक्षण मानल्या जात असे. या गाडीनं सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजावलं होतं.

मारुतीने 39 वर्षांपूर्वी 1983 मध्ये ही कार सुरु केली होती. सध्या ही कार रस्त्यावर दिसत नसली तरी ही एकवेळ अशी होती की याच कारचा बोलबाला होता. खास गोष्ट म्हणजे आज ही या कारची चमक कायम असून ती उठून दिसते.

जेव्हा कंपनीने पहिली मारुती-800 बाजारात उतरवली होती. त्यावेळी या कारची किंमत अवघी 47,500 रुपये (Maruti-800 Price) होती. आता काही हजार वाटणारी ही रक्कम त्याकाळी खूप अधिक होती.

हे सुद्धा वाचा

Maruti Car

मारुती-800 कारचे उत्पादन हरियाणा राज्यात सुरु करण्यात आले होते. त्यानंतर या कंपनीचे नाव बदलून मारुती सुझुकी इंडिया असे झाले. या कारने कित्येक दशके लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कंपनीने 2010 साली या कारचे उत्पादन बंद केले. या कारच्या जागी कंपनीने मारुती ऑल्टोचे उत्पादन सुरु केले.

मारुती सुझुकीची पहिली 800 कार नवी दिल्ली येथील हरपाल सिंह (Harpal Singh) यांनी खरेदी केली होती. या कारचा नोंदणी क्रमांक DIA 6479 असा होता. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना या कारची चाबी दिली होती.

हरपाल सिंह यांनी ही कार आयुष्यभर जपून ठेवली. 2010 त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या कारची अवस्था बिकट झाली. ही गाडी दयनीय अवस्थेत पोहचण्यापूर्वीच तिचा लूक बदलण्याची कल्पना सूचली आणि तिचा चेहरामोहरा बदलण्याचे ठरविण्यात आले.

देशातील पहिल्या मारुतीच्या बिकट स्थितीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर कंपनीने ही गाडी पुन्हा जून्या फार्मात आणण्याचा निश्चिय केला. गाडीत मूळ स्पेअर पार्ट आणि इतर साहित्य लावण्यात आले. मारुती शान असलेल्या या गाडीला कंपनीच्या मुख्यालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.