Post Office Scheme : पोस्टाच्या या योजनेत डबल फायदा, गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा, टॅक्सही वाचणार

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुमचा डब्बल फायदा होईल. गुंतवणुकीवर तुम्हाला जबरदस्त परतावा तर मिळेलच, पण कराची बचतही करता येईल. या योजनेतील बचतीवर कर सवलतीची मागणी करता येईल.

Post Office Scheme : पोस्टाच्या या योजनेत डबल फायदा, गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा, टॅक्सही वाचणार
असा फायदा
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 10:46 PM

नवी दिल्ली : सध्या अनेक जण कर वाचविण्यासाठी, कर सवलतीसाठी गुंतवणुकीचा पर्याय निवडतो. पण केवळ कर सवलतीसाठी गुंतवणूक योजना निवडली तर एकच फायदा घेता येतो. पोस्ट ऑफिसच्या योजनेत केवळ कर बचतच होत नाही तर तुम्हाला बचतीवर चांगला परतावा ही मिळतो. त्यामुळे तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये (Post Office Schemes) गुंतवणूक करणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. पोस्ट कार्यालयाच्या 5 योजनांमध्ये आयकर खात्याच्या अधिनियम (Income Tax Act ) 80सी नियमातंर्गत मोठा फायदा होईल. खातेदाराला बचतीसह कर सवलतीचा (Tax Deduction) ही लाभ घेता येईल. एकाच योजनेवर डब्बल फायदा घेता येईल. 31 मार्च 2023 रोजी पूर्वी प्राप्तिकर सवलत घ्यायची असेल तर या योजना उपयोगी पडतील. गुंतवणुकीवर चांगले व्याज मिळेल. कर सवलतीसाठी दावा ही दाखल करता येईल. या बचत योजनांमध्ये खातेदारांना गुंतविलेल्या रक्कमेवर चांगले व्याज मिळते. या योजनेची कागदपत्रे जोडून आयकर रिटर्न भरल्यास कर सवलत मिळते.आयकर खात्याच्या सेक्शन 80C अंतर्गत सवलतीचा लाभ घेता येतो.

कर सवलतीसाठी राष्ट्रीय निवृत्ती योजना फायदेशीर ठरेल. आयकर अधिनियम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळेल. यासोबतच या योजनेत रिटायरमेंट फंडही जमा होणार असल्याने आयुष्याच्या संध्याकाळी काम करावे लागणार नाही. उतारवयातील आर्थिक तरतूदीसाठी ही योजना सर्वोत्तम मानण्यात येते.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत (Public Provident Fund Scheme) गुंतवणूक आजच्याघडीला मालामाल करणारी आहे. या योजनेवर सध्या 7.1 टक्क्यांचा परतावा मिळतो. या योजनेत 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो.

हे सुद्धा वाचा

ईपीएफ योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हाला 8.1 टक्के व्याज मिळते. तसेच आयकर सवलतीचा लाभ ही घेता येतो. आयकर अधिनियमाची कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची सवलत मिळते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही योजनाही गुंतवणुकीसाठी उत्तम मानण्यात येते. ही एक अल्पबचत योजना आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला व्याज मिळते. 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत आयकर सवलत मिळविता येते. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. या योजनेत तुम्ही 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करु शकता.

अटल पेन्शन योजनेत अत्यंत कमी मासिक हप्ता भरुन तुम्ही दर महिन्याला निवृत्ती रक्कम मिळवू शकता. या योजनेत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. तर योजनेतंर्गत गुंतवणुकीवर 80C नियमान्वये आयकर सवलत मिळते.

पोस्ट कार्यालयाच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केल्यावर आयकर अधिनियमाच्या कलम 80C अंतर्गत लाभ मिळतो. गुंतवणूकदारांना 1.5 लाख रुपयांपर्यंत आयकर सवलतीसाठी दावा दाखल करता येतो. या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षांची आहे. या योजनेवरील व्याजदरात बदल होतो.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.