Post Office : बचत नव्हे कमाई! कर वाचविण्यासाठी या योजना एकदम बेस्ट

Post Office : बचतीने तुम्हाला कमाई साधता येईल आणि त्यावर आयकर खात्यातंर्गत कर ही वाचविता येईल.

Post Office : बचत नव्हे कमाई! कर वाचविण्यासाठी या योजना एकदम बेस्ट
कर सवलत
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 6:21 PM

नवी दिल्ली : जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये (Post Office Schemes) गुंतवणूक करणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. पोस्ट कार्यालयाच्या 5 योजनांमध्ये आयकर खात्याच्या (Income Tax) सेक्शन 80सी नियमातंर्गत मोठा फायदा होईल. तुम्हाला बचतीसह कर सवलतीचा (Tax Deduction) ही लाभ घेता येईल. म्हणजे एकाच योजनेवर तुम्हाला दुहेरी फायदा होईल. 31 मार्च 2023 रोजी पूर्वी प्राप्तिकर सवलत मिळविण्याचा विचार करत असाल तर पोस्ट खात्याच्या योजना तुम्हाला फायदेशीर ठरतील. या योजनेत गुंतवणूक होईल. या बचतीवर व्याज मिळेल. तसेच तुम्हाला कर सवलतीसाठी दावा ही दाखल करता येईल. प्राप्तिकर खात्याच्या सेक्शन 80सी नियमातंर्गत तुम्हाला कर सवलतीचा दावा दाखल करता येईल.

जर तुम्ही पोस्ट खात्याच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर त्याचा फायदा घेता येईल. गुंतवणुकीसंबंधीची कागदपत्रे जोडून तुम्हाला आयकर रिटर्न दाखल करताना कर सवलतीसाठी दावा दाखल करता येतो. आयकर खात्याच्या सेक्शन 80C अंतर्गत सवलतीचा लाभ घेता येतो.

  1. कर सवलतीसाठी राष्ट्रीय निवृत्ती योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. आयकर अधिनियम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो. यासोबतच या योजनेत रिटायरमेंट फंडचाही लाभ मिळतो. उतारवयातील आर्थिक तरतूदीसाठी ही योजना सर्वोत्तम मानण्यात येते.
  2. पब्लिक प्रोव्हिडंड फंड स्कीममध्ये गुंतवणूक करणे ही फायदेशीर ठरते. या योजनेवर सध्या 7.1 टक्क्यांचा परतावा मिळतो. या योजनेत 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो.
  3. हे सुद्धा वाचा
  4. ईपीएफ योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हाला 8.1 टक्के व्याज मिळते. तसेच आयकर सवलतीचा लाभ ही घेता येतो. आयकर अधिनियमाची कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची सवलत मिळते.
  5. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही पोस्टाची एक अल्पबचत योजना आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला व्याज मिळते. 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत आयकर सवलत मिळविता येते. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. या योजनेत तुम्ही 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करु शकता.
  6. अटल पेन्शन योजनेत अत्यंत कमी मासिक हप्ता भरुन तुम्ही दर महिन्याला निवृत्ती रक्कम मिळवू शकता. या योजनेत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. तर योजनेतंर्गत गुंतवणुकीवर 80C नियमान्वये आयकर सवलत मिळते.
  7. पोस्ट कार्यालयाच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केल्यावर आयकर अधिनियमाच्या कलम 80C अंतर्गत लाभ मिळतो. गुंतवणूकदारांना 1.5 लाख रुपयांपर्यंत आयकर सवलत मिळते. या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षांची आहे. या योजनेवरील व्याजदरात बदल होत असतो.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.