खिश्यात पैसा खुळखुळतोय; या 5 स्टॉकवर ठेवा लक्ष, चांगल्या परताव्यासह मालामाल होण्याची संधी

सध्या शेअर बाजारात नाट्यमय उलथापालथ सुरु आहे. परिणामी गुंतवणुकदारांना फार मोठा तोटा सहन करावा लागत आहे. बाजाराच्या नकारात्मक स्ट्रोकमुळे गुंतवणुकदारांचे कोटयवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. बाजारातील काही शेअर दमदार कामगिरी करु शकतात. त्यामुळे गुंतवणुकदारांनी नियोजनपूर्वक गुंतवणूक केल्यास त्यांना चांगला परतावा मिळू शकतो.

खिश्यात पैसा खुळखुळतोय; या 5 स्टॉकवर ठेवा लक्ष, चांगल्या परताव्यासह मालामाल होण्याची संधी
हे 5 स्टॉक करतील मालामालImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 9:27 PM

भारतीय शेअर बाजाराला (Share Market) ग्रहण लागले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बाजाराचा प्रवास उलटया दिशेने सुरु आहे. परिणामी गुंतवणुकदारांना (Investor) फार मोठा तोटा सहन करावा लागत आहे. बाजाराच्या नकारात्मक स्ट्रोकमुळे गुंतवणुकदारांचे कोटयवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. असे असले तरी बाजार अगदीच कोरडा ठणठणीत झाला आहे, असे नाही. बाजाराने काही अनपेक्षित परतावा ही दिला आहे. काही शेअर्संनी तगडे रिटर्न (Big Return) दिले आहेत. तर बाजारातील काही शेअर दमदार कामगिरी करु शकतात. त्यामुळे गुंतवणुकदारांनी नियोजनपूर्वक गुंतवणूक केल्यास त्यांना चांगला परतावा मिळू शकतो. तसेच झालेले नुकसान ही भरुन निघू शकते. बाजारातील तज्ज्ञांनी या शेअर्सच्या कामगिरीविषयी अंदाज वर्तवला आहे. चला तर जाणून घेऊयात कोणते स्टॉक बाजारात करिष्मा करु शकतात ते…

1 अंजता फार्माः अजंता फार्मा येत्या काही दिवसांत मजबूत स्थितीत असेल. ही कंपनी येत्या काही दिवसात चांगली कामगिरी दाखवेल. कंपनी भारतासह आशिया आणि आफ्रिकेतील बाजारात नवीन उत्पादने दाखल करणार आहेत. कंपनी यामाध्यमातून चांगला फायदा कमाविण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एवढेच नाही तर कंपनी बाजारावर मजबूत पकड करेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. कंपनीच्या शेअरचा भाव 2,193 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. बाजारातील तज्ज्ञ या कंपनीच्या शेअरमध्ये 22 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवत आहेत.

2 मारिकोः तज्ज्ञांना हा शेअर ही कामगिरी बजावण्याची आशा आहे. गेल्या काही तिमाहीत खाद्यतेलाचे दर वाढून ही कंपनीने नफ्याचे गणित जमवले आहे. गेल्या दोन-तीन वर्षात कंपनीने खाद्य व्यवसायात मजबूत कामगिरी बजावली आहे. काही दिवसांतच या स्टॉकने 500 कोटींचा लक्षित टप्पा पार केला आहे. व्यवसायाची ही गती पाहता हा शेअर येत्या काही दिवसात डबल होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते या शेअरची किंमत 592 रुपये होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

3. पेडिलाईट कंपनीः त्यांच्या सेग्मेंटमध्ये या कंपनीचा दबदबा आहे. सध्यस्थिती कंपनीकडे 60 टक्क्यांहून अधिक मार्केट शेअर आहे. कंपनीचे कारपेंटर नेटवर्क मजबूत असल्याने हे यश मिळाले आहे. वॉटरप्रुफिंगमध्ये ही कंपनीचा बोलाबाला आहे. कंपनीचा हा व्यवसाय 20 टक्के गतीने वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते कंपनी या स्टाँकच्या किंमतीत 12 टक्कांपर्यंत वाढ दिसून येईल.

4. झी एंटरटेनमेंटः या स्टॉक्सवर तज्ज्ञांची विशेष नजर आहे. तज्ज्ञांच्या मते हा शेअरचा भाव 320 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे सध्याच्या किंमतीत जवळपास 35 टक्के तेजी दिसू शकते.

5. पेटीएमः ही कंपनी जेव्हापासून शेअर बाजारात दाखल झाली, तेव्हापासून कंपनीचा शेअर सातत्याने घसरत आहे. परंतू, आता या कंपनीविषयी तज्ज्ञांना विश्वास वाटत आहे. तज्ज्ञांना हा शेअर कमाल करु शकतो, असे वाटत आहे. व्यावसायिक वृद्धी, डिवाईस आणि क्रेडिट कार्डच्या स्त्रोतातून कंपनीचे तिमाही निकाल बदलू शकतात आणि पुढील वित्त वर्षात कंपनीची घौ़डदौड होऊ शकते, असा अंदाज आहे.

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...