हवाई सफर महागणार?, विमान तिकिटांत वाढीची मागणी; चेंडू सरकारच्या कोर्टात
देशांतर्गत विमान वाहतूक कंपनी इंडिगोने (INDIGO AIRLINES) केंद्राकडं विमान भाड्याची कमाल मर्यादेत वाढ करण्याची मागणी केली आहे. केंद्रानं विमान कंपनीच्या मागणीवर शिक्कामोर्तब केल्यास प्रवाशांना वाढत्या महागाईच्या आगडोंबात वाढत्या विमान तिकिटांच्या दरामुळं झळ बसण्याची शक्यता आहे.
नवी दिल्लीः पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीसोबत विमानाच्या इंधनाचे (AIR FULE RATE) भाव गगनाला भिडत आहे. रशिया-युक्रेन संकटाचा सर्वाधिक फटका विमानाच्या इंधन वाढीला बसला आहे. वाढत्या विमान इंधनाच्या किंमतीमुळे विमान व्यवस्थापन कंपन्या अडचणीत सापडल्या आहेत. कोविड प्रकोपानंतर सावरणाऱ्या विमान कंपन्यांसमोर प्रवासी भाडेवाढ स्थिर राखण्याचं आव्हान निर्माण झालं आहे. दरम्यान, देशांतर्गत विमान वाहतूक कंपनी इंडिगोने (INDIGO AIRLINES) केंद्राकडं विमान भाड्याची कमाल मर्यादेत वाढ करण्याची मागणी केली आहे. केंद्रानं विमान कंपनीच्या मागणीवर शिक्कामोर्तब केल्यास प्रवाशांना वाढत्या महागाईच्या आगडोंबात वाढत्या विमान तिकिटांच्या दरामुळं झळ बसण्याची शक्यता आहे. वर्ष 2020 मध्ये केंद्र सरकारनं विमान भाड्याची (AIR TRAVEL RATE) कमाल व किमान मर्यादा निश्चित केली होती.
किमान व कमाल भाडं निश्चित:
विमान भाड्याची किमान मर्यादा 2900 रुपये निश्चित केली होती. तर कमाल मर्यादा 8800 रुपे निर्धारित करण्यात आसी होती. विमान कंपन्यांच्या तिकिट वाढीबाबत एकाधिकारशाहीला आळा घालण्यासाठी केंद्रानं पाऊल उचललं होतं. भारतीय विमान प्राधिकरणाच्या नियमानुसार 40 मिनिटांपेक्षा कमी कालावधीच्या विमान प्रवासासाठी कोणतीही विमान कंपनी 2900 रुपयांपेक्षा कमी भाडे आकारणी करणार नाही.
इंधनाचे दर दुप्पट:
वर्ष 2020 मध्ये विमान इंधनाचा दर प्रति किलो लीटर 66,266 रुपये होता. वर्ष 2021 मध्ये 77,532 आणि वर्ष 2022 मध्ये 1,23,039 रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या दोन वर्षात विमानाच्या इंधनाच्या दरात दुपटीनं वाढ झाली आहे.
हवाई सफर महागणार:
केवळ रस्त्यावरील वाहतूकच नव्हे हवाई प्रवासही महागणार आहे. विमान इंधन (एटीएफ) 5.3 टक्क्यांनी महागला आहे. चालू वर्षात आतापर्यंत एटीएफ दरात दहावी दरवाढ आहे. राजधानी दिल्लीत एटीएफचे दर प्रति किलोलीटर 6,188 रुपयांनी महागले आहे. सध्या एटीएफचे दर प्रती लीटर 1 लाख 23 हजार 39 रुपयांवर पोहोचले आहेत. विमान वाहतूक कंपन्यांच्या संनियंत्रणात एटीएफची भागीदारी तब्बल 40 टक्क्यांची असते. त्यामुळे विमानाच्या इंधनासाठी अधिक पैसे खर्च करावे लागल्यास त्याचा थेट परिणाम विमान कंपन्यांच्या तिकिटावर होणार आहे. त्यामुळे देशातील विमान कंपन्यांनी तिकिटाच्या दरात वाढ केल्यास सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.