मतदार ओळखपत्र बनवणं झालं एकदम सोपं, केवळ ‘या’ लिंकवर करा क्लिक

मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन ॲप्लिकेशन करताना ते बनवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. वेबसाइटवर लॉग-इन करून फॉर्म डाऊनलोड करू शकता किंवा तो फॉर्म ऑनलाइनही भरू शकता.

मतदार ओळखपत्र बनवणं झालं एकदम सोपं, केवळ 'या' लिंकवर करा क्लिक
मतदान ओळखपत्र Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 12:47 PM

Apply for Voter ID card मतदार ओळखपत्र (Voter ID) हे तुमच्या ओळखीचे सर्वात महत्वाचे प्रमाणपत्र (Document) असते. 18 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा मूलभूत अधिकार मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) दिले जाते. पण हे मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी लोकांना सरकारी कार्यालयात अनेक खेपा माराव्या लागतात. मात्र आता ही प्रक्रिया खूप सोप्पी झाली आहे. जर तुम्हालाही मतदार ओळखपत्र बनावयचे असेल तर हे काम अवघ्या काही मिनिटांत होऊ शकते. केवळ एका लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचे मतदार ओळखपत्र बनवू शकता. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जाऊन काही सोप्या पायऱ्या पूर्ण करून तुम्ही मतदार ओळखपत्रासाठी अर्ज भरू शकता.

10 दिवसांत मिळू शकते मतदार ओळखपत्र :

मतदार ओळखपत्र हवे असल्यास निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जावे लागेल. तेथे ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर केवळ आठवड्याभरात अथवा 10 दिवसांत तुमच्या घरी मतदार ओळखपत्र पोहोचेल. मात्र त्यासंदर्भातील अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडे ओळखपत्र बनवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर लॉग-इन करून फॉर्म क्रमांक 6 डाऊनलोड करावा लागेल. अथवा तुम्ही तो फॉर्म ऑनलाइनही भरू शकता.

या सोप्या पद्धतीने भरा अर्ज :

  1.  निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) वेबसाइटवर जा.
  2.  होमपेजवर National Voters Services Portal यावर क्लिक करावे.
  3.  त्यानंतर अप्लाय ऑनलाइन सेक्शनमध्ये Registration of New Voter यावर क्लिक करावे.
  4.  Form-6 डाऊनलोड करून तेथे विचारण्यात आलेली सर्व माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे ( Documents) अपलोड करावेत.
  5.  फॉर्म भरल्यानंतर लिहीलेली सर्व माहिती पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचावी व सबमिट वर क्लिक करावे.
  6.  त्यानंतर तुम्ही (फॉर्म भरताना) दिलेल्या ई-मेल आयडीवर ( E-mail Id) वर एक लिंक येईल.
  7.  त्या लिंकवर क्लिक केल्यास, तुम्ही मतदार ओळखपत्राच्या (Voter ID card) अर्जाचे (Application) स्टेटस ट्रॅक करू शकाल.

घरी बसल्या बसल्या सहज करा अर्ज :

मतदार ओळखपत्रासाठी तुम्ही घरी बसल्या बसल्या अर्ज करू शकता. अवघ्या काही मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर तुमचे मतदार ओळखपत्र येण्यासाठी कमीत कमी एक आठवडा आणि जास्तीत जास्त एक महिन्याचा काळ लागू शकतो. ऑनलाइन अर्ज भरताना सावधपणे भरावा.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
राष्ट्रवादीकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, काय आहे वैशिष्ट्य?
राष्ट्रवादीकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, काय आहे वैशिष्ट्य?.
शिवसेनेकडून विधानसभेच तिकीट मिळताच गुलाबराव पाटील म्हणाले, मला खात्री
शिवसेनेकडून विधानसभेच तिकीट मिळताच गुलाबराव पाटील म्हणाले, मला खात्री.
'आता गनिमी काव्याने डाव..', जरांगेंचा लवकरच पहिला उमेदवार जाहीर होणार
'आता गनिमी काव्याने डाव..', जरांगेंचा लवकरच पहिला उमेदवार जाहीर होणार.
मलिक वेटिंगवर... NCPच्या पहिल्या यादीत नाव नाही, तिकीट मिळणार की नाही?
मलिक वेटिंगवर... NCPच्या पहिल्या यादीत नाव नाही, तिकीट मिळणार की नाही?.
माहीममध्ये यंदा बिग फाईट, मनसे-शिंदे गट अन् ठाकरे गटामध्ये तिरंगी लढत
माहीममध्ये यंदा बिग फाईट, मनसे-शिंदे गट अन् ठाकरे गटामध्ये तिरंगी लढत.
निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ येथे पक्षप्रवेशाची जय्यत तयारी
निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ येथे पक्षप्रवेशाची जय्यत तयारी.
महायुतीतून भाजपचे 99, शिंदेचे 45 उमेदवार जाहीर, या 18 जागांवर पेच कायम
महायुतीतून भाजपचे 99, शिंदेचे 45 उमेदवार जाहीर, या 18 जागांवर पेच कायम.
'संजय राऊत हा कुत्र्यासारखा...', शहाजी बापू पाटलांची घसरली जीभ
'संजय राऊत हा कुत्र्यासारखा...', शहाजी बापू पाटलांची घसरली जीभ.
दादांच्या राष्ट्रवादीकडून पहिली यादी जाहीर, 'या' 38 उमेदवारांना संधी
दादांच्या राष्ट्रवादीकडून पहिली यादी जाहीर, 'या' 38 उमेदवारांना संधी.
शिंदे-भाजपात 5 जागांचा वाद, 2019 ला बंडानं खेळखंडोबा, यंदा काय होणार?
शिंदे-भाजपात 5 जागांचा वाद, 2019 ला बंडानं खेळखंडोबा, यंदा काय होणार?.