AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ATM Insurance : एटीएमचा असा पण फायदा, फ्री इन्शुरन्सची सुविधा, असा करा दावा

ATM Insurance : बँकेत खाते उघडल्यानंतर ग्राहकाला एटीएम कार्ड मिळते. त्यामुळे थेट बँकेत जाऊन पैसे काढणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. बँक एटीएमचा उपयोग केवळ पैसे काढण्यासाठी होत नाही तर त्यावर मोफत विम्याचे संरक्षण ही मिळते.

ATM Insurance : एटीएमचा असा पण फायदा, फ्री इन्शुरन्सची सुविधा, असा करा दावा
| Updated on: Apr 06, 2023 | 6:25 PM
Share

नवी दिल्ली : रुपे कार्ड आणि पंतप्रधान जनधन योजनेशिवाय इतरही अनेक खातेदारांकडे एटीएम कार्ड (ATM Card) आहे. आता तर बँका ग्रामीण भागातही एटीएम आणि क्रेडिट कार्डची सुविधा देत आहे. त्यासाठी खास ऑफर ही देत आहेत. कोविडनंतरच्या काळात एटीएम आणि ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. थेट बँकेत (Bank) इतर कामासाठी ग्राहक जातात. पण एटीएमचा उपयोग केवळ शॉपिंग अथवा रक्कम काढण्यासाठीच होतो, असे नाही. तर एटीएम कार्डवर मोफत विमाही (Free ATM Insurance Facility) मिळतो. गरजेच्या वेळी या रक्कमेवर दावा करता येतो. विम्याचा दावा करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे.

फ्री इन्शुरन्सची रक्कम कोणत्या बँकेचे एटीएम कार्ड जर तुम्ही 45 दिवसांपेक्षा अधिक काळासाठी वापरले असेल तर तुम्हाला मोफत विम्याची सुविधा मिळते. यामध्ये दुर्घटना विमा आणि जीवन विमा या दोन्ही विम्याचे संरक्षण मिळते. या दोन्ही विम्यासाठी तु्म्ही दावा करु शकता. कार्डच्या श्रेणीनुसार, एटीएम कार्डवरील रक्कम निश्चित होते. क्लासिक कार्डधारकाला 1 लाख, प्लॅटिनमसाठी 2 लाख रुपये, मास्टर कार्डसाठी 5 लाख रुपये, व्हिसा कार्डवर 1.5 ते 2 लाख रुपये आणि सामान्य मास्टर कार्डवर जवळपास 50 हजार रुपयांचा दावा करता येतो.

इतका करता येतो दावा एटीएम कार्डवर तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंताचा विमा मिळतो. प्रधानमंत्री जनधन खात्यावर मिळणाऱ्या रुपे कार्डवर ग्राहकांना 1 ते 2 लाख रुपायांचे विमा संरक्षण मिळते. जर खातेदाराचा अपघाती मृत्यू ओढावला, तर या विमाआधारे त्याच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो. या इन्शुरन्सचा दावा करण्यासाठी कार्ड होल्डरच्या वारसांना बँकेत जाऊन एक अर्ज भरुन द्यावा लागतो. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यावर विम्याची रक्कम कार्डधारकांच्या वारसांना मिळते. अपघातात अपंगत्व आल्यास 50 हजार रुपयांपर्यंत दावा करता येतो.

काय आहे प्रक्रिया बँकेच्या एटीएम कार्डवर मोफत विम्याचा दावा करता येतो. त्यासाठीची प्रक्रिया पण अत्यंत सोपी आहे. त्यासाठी खातेदाराला त्याच्या वारसदाराची माहिती द्यावी लागते. रुग्णालयाचा उपचाराचा खर्च, त्याविषयीचे प्रमाणपत्र, पोलिसांची एफआयआरची एक प्रत याआधारे अपघाती विम्याचा दावा करता येतो. खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याचा वारसदार मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे दाखल करुन नुकसान भरपाई मिळवू शकतो.

तर भूर्दंड भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ATM व्यवहारांसाठी नियम लागू केलेले आहेत. खासगी आणि सरकार बँका आरबीआयने घालून दिलेल्या नियमानुसार आणि शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील एटीएमनुसार तुमच्याकडून मर्यादेबाहेरील व्यवहारांसाठी शुल्क आकारतात. बँकेने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा तुम्ही अधिक वेळा रक्कम काढली तर तुम्हाला त्याचा भूर्दंड सहन करावा लागेल.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.