AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7 लाखांचा विमा तोही अगदी मोफत; जाणून घ्या ‘ईडीएलआय’बद्दल

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कामगारांना पीएफ संदर्भातील अनेक योजनांची माहितीच नसते. यात कर्मचारी डिपॉझिट लिंक इन्शुरन्स म्हणजेच (EDLI) ही प्रमुख योजना आहे. या योजनेत कर्मचाऱ्याचा नोकरी करत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला सात लाख रुपयांपर्यंत विम्याचा लाभ मिळतो.

7 लाखांचा विमा तोही अगदी मोफत; जाणून घ्या 'ईडीएलआय'बद्दल
मोफत विमा
| Updated on: Mar 03, 2022 | 5:40 AM
Share

पुण्यातील एका कारखान्यात काम करणाऱ्या सुरेशचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला. सुरेशच्या मृत्यूनंतर काही दिवसानंतर त्याची पत्नी दोन्ही मुलांना घेऊन विदर्भातील मूळ गावी परत गेली. सुरेश हा पीएफ (PF) अंतर्गत काम करणारा कर्मचारी असल्यानं सात लाख रुपयांच्या विम्याचा (insurance)हक्कदार आहे, अशी माहिती गावातील एका शिक्षकाने तिला दिली. आता सुरेशच्या पत्नीनं काय करायला हवं ? विमा मिळवण्यासाठी काय करावं याची काहीच माहिती सुरेशच्या पत्नीला नव्हती? ही गोष्ट फक्त सुरेशची नाही. तर अनेक जणांची आहे. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कामगारांना पीएफ संदर्भातील अनेक योजनांची माहितीच नसते. यात कर्मचारी डिपॉझिट लिंक इन्शुरन्स म्हणजेच (EDLI) ही प्रमुख योजना आहे. या योजनेत कर्मचाऱ्याचा नोकरी करत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला सात लाख रुपयांपर्यंत विम्याचा लाभ मिळतो. विशेष म्हणजे या विम्यासाठी कर्मचाऱ्याला कोणताही हप्ता भरावा लागत नाही. ज्या कर्मचाऱ्यांचा पगारातून पीएफची रक्कम वजा होते, त्यांनी कुटुंबाला EDLI संदर्भात माहिती दिली पाहिजे. तुमच्या कुटुंबाला पीएफ विम्याची माहिती असल्यास सुरेशच्या कुटुंबाप्रमाणे अडचणींचा सामना करावा लागणार नाही. बऱ्याचदा माहितीचा अभाव असल्यानं कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यात नॉमिनीची नोंदसुद्धा करत नाहीत. अशा परिस्थितीत कायदेशीर उत्तराधिकारी विम्याची रक्कम मिळवण्यासाठी दावा करू शकत नाही.

योजना काय आहे ?

जे कर्मचारी भविष्य निधी म्हणजेच पीएफ योजनेच्या कक्षेत येतात त्यांना मुख्यत: पीएफ आणि पेंशन योजनेबद्दलच माहिती असते. यासोबतच कर्मचारी विमा योजनेअंतर्गत सात लाख रुपयांचा कर्मचाऱ्याला विमा कवच मिळते. विशेष म्हणजे यासाठी कर्मचाऱ्याला कोणताही हप्ता भरावा लागत नाही यासाठी कंपनी कर्मचाऱ्याचा मूळ पगार म्हणजेच बेसिक अधिक महागाई भत्त्याचा 0.5 टक्के रक्कम जमा करते, मात्र, यासाठी मूळ पगार हा 15,000 रुपयांपर्यंत असावा लागतो.

विम्याची रक्कम कशी निर्धारित होते ?

कोणत्याही कर्मचाऱ्याचा सेवाकाळात मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला मागील 12 महिन्यातील सरासरी पगाराच्या 30 पट रक्कम अधिक 20 टक्के बोनस याप्रमाणे एकूण विमा मिळतो विम्याचा लाभ घेण्यासाठी मूळ पगार हा जास्तीत जास्त 15,000 रुपये निर्धारित करण्यात आलाय. ईडीएलआयच्या योजनेअंतर्गत कमाल विमा संरक्षण 7 लाख रुपयांपर्यत मिळते. तर किमान विमा संरक्षण अडीच लाख रुपयांपर्यंत मिळते.

विम्याचा दावा कधी करू शकता?

नोकरीवर असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू आजारपणामुळे, दुर्घटनेत किंवा नैसर्गिकपणे झाल्यास त्या कर्मचाऱ्याचे नॉमिनी ईडीएलआय क्लेम करू शकतात.मात्र, विम्याचा लाभ मिळवण्यासाठी त्या संस्थेत कर्मचाऱ्यांने कमीत कमी एक वर्ष काम केलेलं असावं. कर्मचाऱ्याने नॉमिनीची नोंद केली नसल्यास त्याची पत्नी आणि मुलांना विम्याची रक्कम मिळते. विम्याचा दावा करम्यासाठी ईपीएफओच्या क्षेत्रीय कार्यालयात फॉर्म-5 IF जमा करावा लागतो. या फॉर्मवर कंपनीची स्वाक्षरी असते. नाममात्र औपचारिकता पूर्ण केल्यानं विम्याची रक्कम मृतांच्या कुटुंबाला मिळते.

संबंधित बातम्या

शेअर मार्केट कोसळले, सेन्सेंक्समध्ये 900 अंकाची घसरण; गुंतवणूकदारांना एक लाख कोटींचा फटका

पतंजलीच्या ग्राहकांसाठी खुशखबर! बाबा रामदेव यांनी केले क्रेडिट कार्ड लाँच, प्रोडक्सवर मिळणार भरघोस सूट

जिद्द, चिकाटी आणि रागीट, कोण आहेत अशनीर ग्रोवर, ज्यांना स्वत:च्याच कंपनीतून निघावं लागलं?

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.