जर असे केले नाही तर डिसेंबरपासून बंद होईल Google Pay सह इतर युपीआय पेमेंट

जर तुम्ही तुमचा नंबर बंद करुनही तो युपीआय बॅंक खात्याशी कायम ठेवला आहे. तर तो लवकरच निष्क्रीय केला जाणार आहे. अनपेक्षित पणे पैसे ट्रान्सफर होण्याच्या घटना रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

जर असे केले नाही तर डिसेंबरपासून बंद होईल Google Pay सह इतर युपीआय पेमेंट
UPI PaymentImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 12:41 PM

मुंबई | 30 नोव्हेंबर 2023 : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडीया ( NPCI ) Google Pay, Paytm आणि PhonePe सहित पेमेंट एप्स आणि बॅंकाना एक सर्क्युलर जारी केले आहे. या सर्क्युलरनूसार एका वर्षाहून अधिक वेळ निष्क्रीय युपीआय आयडी आणि फोन क्रमांकांना निष्क्रीय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिडीया रिपोर्टनूसार 7 नोव्हेंबर 2023 च्या या सर्क्युलरचा उद्देश्य मोबाईलधारकांना अनपेक्षित मनी ट्रान्सफर रोखण्याचा आहे. जर ग्राहक आपला जुन्या मोबाईल क्रमांकांना बॅंक सिस्टीममधून हटविल्याशिवाय आपला मोबाईल नंबर बदलत असतील तर त्यांचे आधीचे बॅंक खात्याशी निगडीत नंबर रद्द केले जाणार आहेत.

जुने मोबाईल क्रमांक काही काळानंतर नवीन वापरकर्त्यांना जारी केले जातात. त्यामुळे त्याद्वारे चुकुन पैसै ट्रान्सफर केले जाऊ शकतात. नवीन नियमानूसार थर्ड पार्टी एप प्रोव्हायडर्स ( TPAP ) आणि पमेंट सर्व्हीस प्रोव्हायडर्स ( PSP ) ला 31 डिसेंबर 2023 पर्यंत कारवाई करण्यासाठी सांगण्यात आले आहे.

कसं होणार काम

TPAP आणि PSP बॅंकांना त्या ग्राहकांचे युपीआय आयडी आणि संबंधित युपीआय नंबर आणि फोन नंबरचा पडताळा करण्यास सांगितले आहे ज्याद्वारे युपीआय एपवरुन एक वर्षांपर्यत कोणताही वित्तीय व्यवहार झालेला नाही. अशा ग्राहकांची युपीआय आयडी आणि युपीआय नंबर इनवार्ड क्रेडीट देवाण घेवाणीसाठी निष्क्रीय केले जाणार आहेत. आणि त्याच फोन नंबरना युपीआय मॅपरवरून हटविले जाणार आहे. इनवर्ड क्रेडिट व्यवहारांसाठी ब्लॉक केलेल्या UPI आयडी आणि फोन क्रमांक असलेल्या ग्राहकांना जर आर्थिक व्यवहार करायचा असेल तर UPI मॅपर लिंकेजसाठी त्यांच्या UPI अॅपमध्ये पुन्हा नोंदणी करावी लागेल. ते आवश्यकतेनुसार त्यांचा UPI पिन वापरून देयके आणि गैर-आर्थिक व्यवहार करणे सुरू ठेवू शकतात.

Non Stop LIVE Update
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?.
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'.
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?.
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'.
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास.
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल.
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?.
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव.
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं.