Nominee : नॉमिनीज हवा तरी कशाला? का गरजेचा ठरतो वारसदार

Nominee : जेव्हा बँकेत खाते उघडता अथवा एखादी गुंतवणूक करता, त्यावेळी नॉमिनी जोडायला सांगण्यात येते. जर तुम्ही वारसाचे नाव नाही जोडले तर काय होते, सातत्याने आरबीआय वारसाचे नाव जोडण्यासाठी धोशा का लावते.

Nominee : नॉमिनीज हवा तरी कशाला? का गरजेचा ठरतो वारसदार
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 4:49 PM

नवी दिल्ली | 7 सप्टेंबर 2023 : जेव्हा बँकेत खाते उघडता अथवा विमा पॉलिसी घेता, एखाद्या गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करता, त्यावेळी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वारसाचे नाव (Nominee Name) नोंदवण्याचे आवाहन करण्यात येते. पण अनेकदा वारसाचे नाव नोंदविल्या जात नाही. त्याचा विसर पडतो. वारसाचे नाव नोंदवले तरी काही त्रुटी राहतेच. पण अनेकदा खातेधारकाला प्रश्न पडतो की वारसदाराचे नाव कशाला जोडावे लागते. त्यांचे ओळखपत्राची गरज कशाला असते? खातेधारकाने (Account Holder) वारसाचे नाव नाही जोडले तर काय फरक पडतो. त्याने काय नुकसान होते, अशी अनेकांची शंका असते. वारस नेमला नाही आणि एखादी दुर्घटना घडली तर खातेदाराच्या रक्कमेचे काय होते. त्या रक्कमेवर कोणाला हक्क सांगता येतो. या रक्कमेवरील वादात कोण उजवं ठरते, असे अनेक प्रश्न खातेदाराला पडतात.

का गरजेचा आहे वारस

बँक, विमा कंपनी अथवा गुंतवणूक करताना वारसदाराच्या नावाची नोंदणी करण्यात येते. खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना कोणाकडे आर्थिक मदतीसाठी हात पसरावे लागत नाही. खातेदाराचा मृत्यू झाला तरी त्याच्या वारसदारांना नुकसान भरपाई मिळते. पण एखाद्याने वारसाचे नाव खात्याशी जोडले नसेल तर त्याच्या वारसदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना बँक खात्यात जमा रक्कम काढता येत नाही. वारसदार असल्याचे सिद्ध करण्यासाठी कुटुंबियांना न्यायालयीन लढाई लढावी लागते. न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागतो. कायदेशीर वारस सिद्ध करण्यासाठी वेळ आणि पैसा वाया जातो. वारसदाराचे नाव जोडलेले असेल तर कोणत्याही कायदेशीर जाच न राहता सहज खात्यातील रक्कम काढता येते.

हे सुद्धा वाचा

विमा पॉलिसीमध्ये आवश्यक

जीवन विमा पॉलिसीमध्ये वारसदाराची नोंद करणे आता आवश्यक करण्यात आले आहे. पण यापूर्वीच्या पॉलिसीत तुम्ही नावाची नोंदणी केली नसेल तर ती करुन घ्या. नाहीतर पुढे अडचण येऊ शकते. कुटुंबियांना नाहक ताप होऊ शकतो. विमाधारकाचा मृत्यू ओढावल्यास त्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईसाठी कायदेशीर अडचण येते. त्यामुळे विमा पॉलिसीत वारसाच्या नावाची नोंद करणे आवश्यक आहे.

वारसाचे नाव नसेल तर?

जर एखाद्या खातेदाराने, विमाधारकाने त्याच्या वारसाचे नाव जोडले नाही. तो मयत झाला. त्या रक्कमेवर कोणी दावा केला नाही तर अशी रक्कम बुडते. ती तिच्या वारसांना मिळत नाही. या रक्कमेवर बँक दावा सांगते. ही रक्कम बँकेकडे जमा होते.

कशी करता येईल नोंद?

पती-पत्नी, आई-वडिल यांच्यापैकी कोणाला वारस नेमायचे, त्यांना किती टक्के शेअर द्यायचा याची पण तरतूद करता येते. पॉलिसीनुसार ही तरतूद असते. बँक खात्यात नाव जोडण्यासाठी सोपी पद्धत आहे. बँकेत जाऊन याविषयीचा अर्ज भरावा लागेल. आता तर ही सुविधा ऑलनाईन पण उपलब्ध करुन देण्यात आली आहे. केवायसी अपडेट केल्यावर तुम्हाला लागलीच वारसाची नोंद करता येते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.