नवी दिल्ली: देशातील कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. तेल विपणन कंपन्या IOC, HPCL आणि BPCL यांनी रविवारी इंधनाच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. देशाची राजधानी दिल्ली, मुंबई, कोलकाता आदीसह देशातील विविध शहरांमध्ये रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.
पेट्रोलियम कंपन्यांनी रविवाी सकाळी जाहीर केलेल्या दरांनुसार, दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 104.01 रुपये आणि डिझेलची किंमत 86.71 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.96 आणि 94.13 रुपये प्रतिलीटर इतका आहे.
इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर, आता सर्वात महाग पेट्रोल राजस्थानच्या जयपूरमध्ये मिळत आहे. याठिकाणी पेट्रोलचा प्रतिलीटर दर 111.10 रुपये इतका आहे. त्यानंतर मुंबई (109.98) आणि आंध्र प्रदेशचा (108.20) क्रमांक लागतो. दुसरीकडे, बहुतांश भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या खाली आले आहेत. मात्र, मध्य प्रदेशात तो 107.23 रुपये आणि बिहारमध्ये पेट्रोल 105.90 रुपये प्रति लिटर आहे.
त्याचप्रमाणे सर्वात महाग डिझेलही जयपूरमध्येच मिळत असून ते 95.71 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. आंध्र प्रदेशात डिझेलचा दर 95.18 रुपये आणि मुंबईत 94.14 रुपये प्रति लिटर आहे. तर मिझोरममध्ये सर्वात स्वस्त डिझेल 79.55 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.
आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.
भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क (केंद्रीय उत्पादन शुल्क) 5 रुपये आणि 10 रुपयांनी कमी केल्यानंतर, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनीही सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. या राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट (व्हॅट- व्हॅल्यू अॅडेड) कर) कमी केला आहे. पेट्रोलच्या दरात सर्वात मोठी घट कर्नाटकात झाली आहे. कर्नाटकात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 13.35 रुपयांनी कमी झाले आहेत. त्याचवेळी, पेट्रोलच्या किंमती कमी करण्यात पुद्दुचेरी आणि मिझोरामचा क्रमांक लागतो. या राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 12.85 रुपयांनी आणि 12.62 रुपयांनी खाली आले आहेत. त्याचवेळी, डिझेलच्या बाबतीतही कर्नाटकने सर्वाधिक कपात केली आहे, ज्यामुळे दर प्रति लिटर 19.49 रुपयांनी खाली आले आहेत. त्यापाठोपाठ पुद्दुचेरी आणि मिझोरामचा क्रमांक लागतो.
संबंधित बातम्या:
इलेक्ट्रिक वाहन मालकांचं टेन्शन कमी होणार, BPCL 7000 पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार
कोणत्या राज्यात पेट्रोल आणि डिझेल किती स्वस्त?, तुमच्या शहरातील दर काय?
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! ‘या’ स्थानकावर डिलक्स टॉयलेट अन् एसी लाऊंजची सुविधा मिळणार