WhatsApp वर करा गॅसचे बुकिंग, इतकी सोपी आहे पद्धत

WhatsApp Gas Booking | व्हॉट्सअपचा वापर आता चॅटिंगपूरताच मर्यादीत राहिला नाही. चॅटिंगसह ऑडिओ-व्हिडिओ कॉलसाठी त्याचा वापर होत आहे. तर आता युपीआयसारखाच पैसे हस्तांतरीत करण्यासाठी, बिल अदा करण्यासाठी आणि व्हॉट्सअपच्या मदतीने तुम्ही गॅस सिलेंडरचे बुकिंग सुद्धा करु शकता.

WhatsApp वर करा गॅसचे बुकिंग, इतकी सोपी आहे पद्धत
Follow us
| Updated on: Jan 06, 2024 | 4:02 PM

नवी दिल्ली | 6 जानेवारी 2024 : व्हॉट्सअप आता चॅटिगपुरते मर्यादीत राहिलेले नाही. चॅटिंगसह इतर अनेक कामं आता व्हॉट्सअपच्या मदतीने करता येतात. अनेक बँका आता व्हॉट्सअपवर मर्यादीत बँकिंग सोयी-सुविधा पुरवत आहेत. इतकेच नाही तर तुम्हाला गॅसचे बुकिंगसुद्धा व्हॉट्सअपवर करता येईल. अनेक गॅस रिफलिंग कंपन्यांनी ही सेवा सुरु केली आहे. भारतात कोट्यवधी लोक व्हॉट्सअपचा वापर करतात. अनेक कंपन्या त्यांचा सेवा व्हॉट्सअपद्वारे पुरवितात. यामध्ये गॅस बुकिंगची सेवा पण सुरु झाली आहे.

प्रत्येक वेळी एजन्सीवर जाण्याची गरज नाही

अनेक जण मोबाईलवरुन बुकिंगसाठी एजन्सीला कॉल करतात. एकतर समोरील व्यक्ती फोन उचलत नाही अथवा ही लाईन बिझी येते. काहीजण एजन्सीच्या कार्यालयात जातात. तिथे बुकिंगसाठी पण रांग असते. आता हा मनस्ताप कमी होणार आहे. तुम्हाला व्हॉट्सअपवर गॅस बुकिंग करता येईल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवरुन गॅस बुकिंगसाठी तुमच्या कंपनीच्या क्रमांकावर संपर्क करावा लागेल. त्यावर मॅसेज पाठवावा लागेल.

हे सुद्धा वाचा

या क्रमांकावर पाठवा मॅसेज

देशातील गॅस रिफिलिंग कंपन्या पण व्हॉट्सअपवर सेवा देत आहेत. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन तुम्हाला त्यांच्या व्हॉट्सअपवर मॅसेज पाठवावा लागेल. त्यासाठी HP GAS- 9222201122, Indane- 7588888824 आणि Bharat Gas-1800224344 हा क्रमांक सेव्ह करा. त्यावर मॅसेज पाठवून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानुसार गॅस बुकिंग करता येईल.

असे करा बुकिंग

तुमच्या गॅस कंपनीचा क्रमांक सेव्ह करा. व्हॉट्सअपवर जाऊन HI लिहा. त्यानंतर तुमची भाषा निवडा. यानंतर व्हॉट्सअपवरच तुम्हाला गॅस बुकिंग, नवीन कनेक्शन, एखादी तक्रार हे सर्व पर्याय येथेच उपलब्ध होतील. त्यातील तुमचा पर्याय निवडा. गॅसचे बुकिंग करायचे असेल तर लगेचच हा पर्याय निवडता येईल. रिफिल बुक केल्यानंतर स्थानिक सेवेनुसार तुमच्या घरी गॅस येईल. पण ही सेवा घेण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक संबंधित कंपनीकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. सध्या ई-केवायसी करणे पण आवश्यक आहे. एजन्सीवर जाऊन ते पूर्ण करता येईल.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.