दोन मिनिटात लोन मिळतंय? थांबा मोहात पडू नका, हा व्हिडीओ संपूर्ण पहा, निर्णय घ्या !
तुम्ही तुमच्य़ा मोबाईलच्या प्ले स्टोअरवर (Play Store) गेलात आणि तातडीने कर्ज पुरवठा करणारे अॅप (Apps that provide loans) सर्च केले तर तुम्हाला प्ले स्टोअरवर हजारो अॅप मिळतील. मात्र अशा अॅपवरून कर्ज न घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो.
मुंबई : तुम्ही तुमच्य़ा मोबाईलच्या प्ले स्टोअरवर (Play Store) गेलात आणि तातडीने कर्ज पुरवठा करणारे अॅप (Apps that provide loans) सर्च केले तर तुम्हाला प्ले स्टोअरवर हजारो अॅप मिळतील. मात्र अशा अॅपवरून कर्ज न घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो. या मागील सर्वात मोठं कारण म्हणजे या अॅपवरून तुम्हाला तात्काळ अगदी एक दिवसाच्या अवधीमध्ये देखील पाच हजारांपासून पाच लाखांपर्यंत लोन मिळते. मात्र या कर्जाचा व्याजदर हा बँकांच्या (bank) तुलनेमध्ये खूप जास्त असतो. मात्र तरी देखील अनेक जण या अॅपच्या माध्यमातूनच कर्ज घेतात, आणि पुढे अनेक दिवस हे कर्ज भरत बसतात. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, म्हणून भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयची अशा अॅपवर करडी नजर आहे, आतापर्यंत या पद्धतीने लोन देणाऱ्या जवळपास 650 हुन अधिक अॅप आरबीआयने अवैध ठरवल्या आहेत. त्यातील 100 अॅप प्ले स्टोअरवरून हटवण्यात देखील टाकण्यात आल्या आहेत. असे असताना देखील सध्या या अॅपचा बोलबाला आहे.
कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत 12 पटीने वाढ
उपलब्ध डेटानुसार गेल्या तीन वर्षांमध्ये अॅपच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्यांची संख्या जवळपास 12 पटीने वाढली आहे. 2017 मध्ये अशा ऑनलाईन अॅपच्यामाध्य्मातून घेतलेल्या कर्जाची रक्कम 11, 6 71 कोटी रुपये इतकी होती. तीच 2020 मध्ये वाढून 141821 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. अशा ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्यांची संख्या का वाढली त्याचे मुख्य कारण म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट जमा करावे लागत नाहीत, इथे कर्ज घेण्यासाठी तुमच्या सीबील स्कोरची देखील आवश्यकता नसते. तसेच तुमची सॅलरी कितीही कमी असेल तर तुम्हाला सहज लोन मिळते. हेच लोन तुम्हाला बँकेकडून घ्यायचे झाल्यास तुमच्याकडे वेगवेगळ्या ड्यॉक्युमेंटची मागणी केली जाते. तुमची सॅलरी किती आहे, तुम्ही यापूर्वी कुठून लोन घेतले आहे का? तुमचा सीबील स्कोर किती आहे. अशा सर्व गोष्टी चेक करूनच तुम्हाला बँकेतून लोन मिळते. बँकेमधून लोन घ्यायचे झाल्यास तुम्हाला 15 ते 20 दिवसांचा कालावधी आरामशिर लागतो. मात्र या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला तातडीने लोन मिळत असल्याने अनेकजण अशा अॅपच्या माध्यमातून लोन घेतात.
फसवणूक कशी होते?
तुम्हाला लोनची आवश्यकता लागल्यास तुम्ही सर्व प्रथम अशा लोन देणाऱ्या अॅपचा विचार करता. तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन कर्ज देणारे एखादे अॅप डाऊलोड करता. अॅप डाऊनलोड करण्यापूर्वीच संबंधित अॅप तुमच्या मोबाईलाचा संपूर्ण ताबा घेऊन टाकते. त्यासाठी तुम्हाला परवानगी मागितली जाते आणि ती तुम्हाला द्यावी देखील लागते. कारण त्याशिवाय हे अॅप डाऊनलोडच होत नाही. अॅप डाऊनलोड झाल्यानंतर तुम्ही कर्जासाठी अप्लाय करता. तुम्हाला आवश्यक असलेले कर्ज अवघ्या काही तासांमध्ये तुमच्या खात्यावर जमा देखील होते आणि त्यानंतर खरा खेळ सुरू होतो. पहिली गोष्ट म्हणजे या अॅपच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाचे दर अव्वाच्या सव्वा असतात. तेवढे कर्ज तुमच्याकडून वसूल केले जाते. तुम्हाला हफ्ता भरण्यास उशिर झाला तर तुमच्याकडून मोठ्याप्रमाणात दंड देखील आकारला जातो. एवढेच नाही तर कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी तुमच्यावर इतके प्रेशर टाकले जाते, की या तणावातून अनेकांनी आत्महत्या केल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा अॅपच्या माध्यमातून कर्ज घेण्यापूर्वी हजारवेळा विचार करण्याचा सल्ला तज्त्रांकडून दिला जातो.
अॅपवरून लोन का घेऊ नये? पहा व्हिडीओ
संबंधित बातम्या
सेमीकंडक्टरचा तुटवडा, वाहन उद्योगाला ‘ब्रेक’; ठोक विक्रीत 8 टक्क्यांनी घट
नारळाची करवंटी फेकून देण्याचा मूर्खपणा करु नका! हे तर पैसे कमावण्याचं साधन आहे
Stock Market Update Today: घसरणीचं सत्र थांबेना, सेन्सेक्स 773 अंकांनी गडगडला