अवघ्या 100 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 15.66 लाखांचा परतावा, जाणून घ्या एलआयसीच्या जीवन तरुण प्लॅनबद्दल

अनेक जण आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशांची गरज लक्षात घेऊन गुंतवणूक करतात. त्यामुळे ते नेहमी अशा प्लॅनच्या शोधात असतात की ज्या प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास मुलाच्या उच्च शिक्षणासाठी पैसा कामाला येईल. पालकांची ही गरज एलआयसीचा (LIC) जीवन तरुण प्लॅन (LIC Jeevan Tarun Plan) पूर्ण करू शकतो.

अवघ्या 100 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 15.66 लाखांचा परतावा, जाणून घ्या एलआयसीच्या जीवन तरुण प्लॅनबद्दल
एलआयसी (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 10:57 AM

आजच्या काळात शिक्षण (Education) आणि आरोग्यावरील खर्च वाढला आहे. मुलांच्या गरजा पू्र्ण करताना आर्थिक बजेट कोलमडत आहे. मुलं जसजशी मोठी होत जातात, तसतसा त्यांचा खर्च देखील वाढत जातो. हेच लक्षात घेऊन सध्या अनेक पालकांकडून आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. अनेक जण आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशांची गरज लक्षात घेऊन गुंतवणूक करतात. त्यामुळे ते नेहमी अशा प्लॅनच्या शोधात असतात की ज्या प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास मुलाच्या उच्च शिक्षणासाठी पैसा कामाला येईल. पालकांची ही गरज एलआयसीचा (LIC) जीवन तरुण प्लॅन (LIC Jeevan Tarun Plan) पूर्ण करू शकतो. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीने मुलांच्या गरजा लक्षात घेऊन ही पॉलिसी तयार केली आहे. एलआयसीचा जीवन तरुण प्लॅन हा एक नॉन-लिंक्ड, सहभागी, वैयक्तिक जीवन विमा बचत योजना आहे. जेव्हा तुम्ही या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला या प्लॅनमधून विम्याचे संरक्षण आणि एक चांगला परतावा अशा दोनही गोष्टींचा लाभ होतो.

पॉलिसीचा कालावधी

ही पॉलिसी घेण्यासाठी तुम्ही ज्या मुलाची अथवा मुलीची पॉलिसी काढणार आहात, तिचे वय 90 दिवस पूर्ण झालेले असावे. या पॉलिसीचा कालावधी जास्तीत जास्त बारा वर्षांचा आहे. त्यामुळे तुमच्या घरात जर बारा वर्षांच्या आतील मुलं असतील तर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता. एलआयसीची ही योजना मुलांचे भवितव्य लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही जर तुमचा मुलगा एक वर्षांचा होण्याच्या आत गुंतवणुकीला सुरुवात केली तर तो 25 वर्षांचा झाल्यानंतर चांगला परतावा मिळतो. उदा. जर तुमच्या मुलाचे वय एक वर्ष आहे, आणि तुम्ही जर आतापासून त्याच्या नावावर महिन्याला तीन हजार म्हणजे दिवसाला 100 रुपयांची गुंतवणूक या योजनेंतर्गंत केल्यास तुम्हाला कालावधी पूर्ण झाल्यानंतर 15.66 लाखांचा परतावा मिळतो. या योजनेचा कालावधी 25 व्या वर्षी पूर्ण होतो. मात्र तुम्हाला केवळ 20 वर्षच पैसे भरावे लागतात.

प्रीमियम भरण्याचे मार्ग

तुम्ही जर एलआयसीच्या जीवन तरुण प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही दर महिन्याला हप्त्याचा भरणा करू शकता. तुमच्या पगारामधून हप्ता आपोआप कट होईल. तुम्ही दर तीन महिन्याला देखील हप्ता भरू शकता, दर सहा महिन्यांनी किंवा एकदाच वनटाईम पेमेंट करण्याची सुविधा देखील या योजनेमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुलाच्या सुरक्षीत भविष्यासाठी हा प्लॅन उपयोगी असून, सध्या या प्लॅनमधील गुंतवणूक वाढत आहे.

संबंधित बातम्या

Reserve Bank of India : सामनाच्या अग्रलेखातून रिझर्व्ह बॅंकेवरती टीका, निवडणुकांमुळे इंधन दरवाढ कशी रोखून ठेवली

Russia-Ukraine war : भारतातून गहू, साखरेची निर्यात वाढली, भावात तेजीचे संकेत

Petrol-Diesel Price : सर्वसामान्यांना मोठा दिलासा, सलग तीसऱ्या दिवसी इंधनाचे दर स्थिर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.