दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील बाजारपेठा गजबजल्या; घरं, गाड्या आणि सोन्याची जोरदार खरेदी

Gold price | गेल्यावर्षी करोना संकट आणि जागतिक अस्थिरतेने सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. गेल्या दसऱ्याला प्रति तोळा 50,500 रुपये असलेले सोन्याचे भाव यंदा घसरून घाऊक बाजारात प्रति तोळा 47070 रुपयांवर उतरले. त्यामुळे ग्राहकांमध्ये सोने खरेदीसाठी उत्साह दिसून आला.

दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील बाजारपेठा गजबजल्या; घरं, गाड्या आणि सोन्याची जोरदार खरेदी
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 7:54 AM

मुंबई: साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने, मालमत्ता आणि वाहनांच्या खरेदीसाठी राज्यभरात उत्साह दिसून आला. दोन वर्षांनंतर हे सुखदायी चित्र पाहायला मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोने खरेदी साधारण 25 टक्क्यांनी वाढली. शुक्रवारी दिवसभरात राज्यात 163 घरांची दस्त नोंदणी झाली.

गेल्यावर्षी करोना संकट आणि जागतिक अस्थिरतेने सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. गेल्या दसऱ्याला प्रति तोळा 50,500 रुपये असलेले सोन्याचे भाव यंदा घसरून घाऊक बाजारात प्रति तोळा 47070 रुपयांवर उतरले. त्यामुळे ग्राहकांमध्ये सोने खरेदीसाठी उत्साह दिसून आला.

नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवसापासून सोन्याच्या मागणीत वाढ

नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून सोन्याच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे.त्यामुळे सोन्याच्या भावात घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत प्रतितोळा 1,170 रुपयांची वाढ झाली. चांदीचे भावदेखील प्रतिकिलो 63600रुपयांवर पोहोचले. त्यात आठ दिवसांत प्रतिकिलो 2300 रुपयांची भर पडली.

दसऱ्याला सोन्याची रेकॉर्डब्रेक विक्री होण्याचा अंदाज

दसऱ्याच्या दिवशी सोने खरेदीसाठी गर्दी होईल, हा सराफा व्यावसायिकांचा अंदाज बहुतांश खरा ठरला. सऱ्याच्या मुहूर्तावर राज्यात सोन्याची खरेदी-विक्री 350 ते 400 कोटी तर मुंबईत 200 कोटींचा टप्पा गाठेल, असा विश्वास सराफा बाजाराने व्यक्त केला होता.

सोन्याच्या खरेदी-विक्रीसाठी येणारा ग्राहक नाण्यांपेक्षा दागिन्यांना अधिक महत्त्व देत आहे नाण्यांच्या खरेदीचे प्रमाण 40 टक्के आहे. तर दागिन्यांच्या खरेदीचे प्रमाण 60 टक्के आहे. हॉलमार्किंगच्या दागिन्यांसह शुद्ध सोन्याची खरेदी विक्री देखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या बाजारात तेजी कायम राहील. बाजारात मोठी बुकिंग आहे कारण गेल्या वर्षी कोरोनामुळे बाजारपेठा पूर्णपणे ठप्प होत्या. आता मात्र बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत, असे मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष कुमार जैन यांनी सांगितले होते.

सोन्यामध्ये हुशारीने गुंतवणूक करा

तज्ज्ञांच्या मते, सोन्यात गुंतवणूक करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी गुंतवणूकदाराने विचार करावा. ते दीर्घकालीन दृष्टिकोनातून आणि विविधतेच्या दृष्टिकोनातून आणि महागाईच्या हेजमधून सोन्यात गुंतवणूक करण्याचे सुचवतात. सोन्यामध्ये गुंतवणूक भौतिक सोने, सार्वभौम सुवर्ण रोखे, गोल्ड ईटीएफ, गोल्ड फंड या स्वरूपात करता येते. कर वाचवू पाहणारे गुंतवणूकदार सुवर्ण निधीची निवड करू शकतात. या प्रकारच्या गुंतवणुकीवर टीडीएस लागू नाही. त्याऐवजी हे फंड फक्त दागिने खरेदी आणि विक्रीवर कर लावले जातात. गुंतवणुकीची पद्धत स्पष्टपणे गुंतवणूकदाराची गरज आणि जोखीम भूक यावर अवलंबून असते. ज्यांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणायचे आहे आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून सोन्यात गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी सोन्यात गुंतवणूक करण्याचा डिजिटल मार्ग हा एक आकर्षक पर्याय असू शकतो.

कोविड 19 मध्ये डिजिटल सोन्याची विक्री वाढली

कोविड 19 महामारी सुरू झाल्यानंतर डिजिटल पद्धतीने सोने खरेदी करण्याचा कल वाढला आहे. डिजिटल सोने हे सोन्यात गुंतवणूक करण्याचा एक पूर्णपणे वेगळा मार्ग आहे. तुम्ही त्यात किमान एक रुपयासह गुंतवणूक करू शकता. हे सहज खरेदी आणि विकले जाऊ शकते. या वैशिष्ट्यांमुळे गुंतवणूकदार डिजिटल सोन्याकडे आकर्षित होत आहेत आणि त्यात गुंतवणूक करत आहेत. भौतिक सोन्याच्या देखभाल आणि सुरक्षिततेबद्दल नेहमीच चिंता असते. या वर्षी आर्थिक साधनांद्वारे डिजिटल पद्धतीने सोने खरेदी करण्याची गरज कोविड 19 आणि सामाजिक अंतराने अनेक पटीने वाढली.

संबंधित बातम्या:

Income Tax: तुम्ही घरामध्ये किती सोनं ठेवू शकता? काय आहे नियम; उल्लंघन झाल्यास आयकर विभागाची कारवाई

घरात पडून असलेलं सोनं बँकेत ठेवून पैसे कमावण्याची संधी, जाणून घ्या काय आहे योजना?

आता ‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

(Gold buying on dussehra 2021)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.