Gold Silver Price : सोन्याने तोडले सर्व रेकॉर्ड! चांदीत आपटी बार, 10 ग्रॅमचा भाव काय

Gold Silver Price : सोन्याच्या किंमतींनी आज नवीन उच्चांक गाठला, आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले, खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Price : सोन्याने तोडले सर्व रेकॉर्ड! चांदीत आपटी बार, 10 ग्रॅमचा भाव काय
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Jan 25, 2023 | 4:35 PM

नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतींनी नवीन उच्चांक (Gold New Record) गाठला. मंगळवारीच सोन्याच्या किंमतींनी सर्व रेकॉर्ड तोडले. भारतीय सराफा बाजारात किंमत कायम होती. तर वायदे बाजारात (Multi Commodity Exchange) सोन्याचा भाव थोडा उतरला. चांदीची चमक थोडी फिक्की पडली. तरीही चांदी गेल्या (Silver Rate) सहा महिन्यात वधारली आहे. मंगळवारी सोन्याचा भाव 57,322 रुपये प्रति 10 असा उच्चांकी होता. यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 रुपयांचा रेकॉर्ड तयार केला होता. गेल्या विक्रमापेक्षा यावेळी सोन्याच्या किंमतींत 1000 रुपयांची तेजी दिसून आली. सोन्याचे भाव अजून वधारतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सोने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या काळात सोन्याचा भाव 62 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचेल. तर चांदीचा भाव 80 हजार रुपयांच्या पुढे जाईल. बुधवारी वायदे बाजारात (MCX) सोने आणि चांदीच्या भावात घसरण दिसून आली. पण सराफा बाजारात सोन्याच्या भावात तेजी कायम आहे.

बुधवारी वायदे बाजारात दुपारी 1 वाजेदरम्यान सोने 109 रुपयांनी घसरले. सोने प्रति 10 ग्रॅम 56860 रुपयांवर व्यापार करत होते. तर चांदीत 69 रुपयांची घसरण होऊन ते 68473 रुपये प्रत‍ि क‍िलोवर व्यापार करत होते. वायदे बाजारात भाव कमी झाले असले तरी सराफा बाजारात तेजी दिसून आली.

हे सुद्धा वाचा

सराफा बाजारात बुधवारी सोने-चांदीच्या किंमती किचिंत घटल्या. इंडिया बुलियन्स असोसिएशनने (ibjarates.com) बुधवारी सकाळी किंमती जाहीर केल्या. 24 कॅरेट सोन्यात जवळपास 190 रुपयांची घसरण झाली. सोने 57138 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅम होते. तर चांदीत 190 रुपयांची घट होऊन किंमती 67947 रुपये प्रत‍ि क‍िलो झाल्या.

विना जीएसटी बुधवारी 23 कॅरेट सोन्याचा भाव 56909 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 52338 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 52854 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅमवर पोहचल्या. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 57322 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

ibja केंद्र सरकारने घोषीत केलेल्या सुट्यांच्या दिवशी, शनिवार आणि रविवारी दर जाहीर करत नाही. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या किरकोळ भाव जाणून घेण्यासाठी ग्राहकांना 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. याशिवाय एसएमएस करुनही किंमती माहिती करुन घेता येईल.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बेस इंपोर्ट प्राईसमध्ये (Base Import Price) वाढ केली आहे. तर चांदीवरील बेस इंपोर्ट प्राईस घटवली. त्याआधारे सोने-चांदी आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कर आकारण्यात येईल.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...