Gold Coin : हॉलमार्कविना सोन्याचे शिक्के खरेदी करता येईल का? नवा नियम काय सांगतो

Gold Coin : देशात सोने सध्या त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर आहे. पण देशात हॉलमार्किंग सोने 1 एप्रिल 2023 पासून अनिवार्य करण्यात आले आहे. अक्षय तृतीयाला अनेक जणांना सोन्याचे शिक्के आणि तुकडे खरेदी करताना या नियमाचा अडसर तर येणार नाही ना..

Gold Coin : हॉलमार्कविना सोन्याचे शिक्के खरेदी करता येईल का? नवा नियम काय सांगतो
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 7:32 PM

नवी दिल्ली : देशात सोने (Gold Price) सध्या त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर आहे. पण देशात हॉलमार्किंग सोने 1 एप्रिल 2023 पासून अनिवार्य करण्यात आले आहे. अक्षय तृतीयाला अनेक जणांना सोन्याचे शिक्के आणि तुकडे खरेदी करतात. यंदा 22 एप्रिल रोजी अक्षय तृतीया (Akshay Tritiya) येत आहे. सोने खरेदी करण्यासाठी हा चांगला मुहूर्त मानण्यात येतो. सोने खरेदी अक्षय असते, अशी मान्यता आहे. पण देशात हॉलमार्किंगचा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे हॉलमार्किंगचा हा नियम (Hallmarking Rules) सोन्याची खरेदी करताना अडसर तर ठरणार नाही ना? दागिने आणि आभुषणांवर लागू असलेला हा नियम गोल्ड काईन, बिस्किट, तुकडा यावर पण लागू असेल का? काय सांगतो नवीन नियम..

Hallmarking Rules हॉलमार्किंगचा नियम केवळ सोने आभुषण, दागिणे आणि सजावटीच्या वस्तू यांना अनिवार्य करण्यात आला आहे. जर तुम्ही सोन्याची ज्वेलरी अथवा सामान खरेदी करणार असाल तर त्यावर हॉलमार्क असणे आवश्यक आहे. तुम्ही जर व्हाईट गोल्ड अलॉयपासून तयार सोने खरेदी करत असाल तर त्याला हॉलमार्किंग अनिवार्य आहेच.

या शिक्कावर हॉलमार्क हॉलमार्किंगच्या नियमानुसार, देशात सोन्याच्या शिक्क्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आलेले नाही. भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या संकेतस्थळानुसार, हॉलमार्किंगचा नियम केवळ दागिणे आणि सजावटीच्या वस्तूंसाठी अनिवार्य करण्यात आला आहे. परंतु, बीआयएस मान्यता प्राप्त रिफायनरी अथवा टाकसाळमध्ये केवळ 999 आणि 995 शुद्धतेच्या हॉलमार्क सोन्याचे शिक्के तयार होतात. बीएसईच्या संकेतस्थळानुसार, सध्या देशात मान्यताप्राप्त 43 रिफायनरी आहेत. 19 जानेवारी 2022 पर्यंतचा हा आकडा आहे. त्यांची यादी तुम्ही संबंधित संकेतस्थळावर पाहु शकता.

हे सुद्धा वाचा

शिक्क्यांवर हॉलमार्किंग बीआयएसचे महानिदेशक प्रमोद कुमार तिवारी यांच्या मते, आभुषणे, दागिणे आणि वस्तूंवर हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे. आता सरकार गोल्ड कॉईनवर पण हॉलमार्किंग अनिवार्य करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार, प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.सोन्याचे शिक्के आणि तुकड्यासाठी हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात येऊ शकते. त्यामुळे देशात शुद्ध दागिन्यांसह शुद्ध सोन्याची नाणे पण मिळतील.

काय आहे हॉलमार्किंग हॉलमार्किंग सोन्याचे दागिणे, आभुषण, वस्तू याच्या शुद्धतेची हमी देते. त्याआधारे ग्राहकाला शुद्ध सोन्याचा भरोसा देण्यात येतो. याविषयी त्या वस्तूवर चिन्हांकित करण्यात येते. हॉलमार्किंग करण्यासाठी प्रति युनिट 35 रुपये खर्च येतो.

अशी तपासा शुद्धता

  1. हॉलमार्किंगच्या आधारे तुम्ही खरे आणि खोटे सोने तपासून शकता.
  2. त्यासाठी दागिने, सोन्यावरील हॉलमार्किंग तुम्ही तपासून घ्या
  3. सोन्याचा हॉलमार्क 375 असेल तर सोने 37.5 टक्के शुद्ध असेल
  4. हा हॉलमार्क 585 असेल तर हे सोने 58.5 टक्के शुद्ध आहे
  5. 750 हॉलमार्क असलेले सोने 75.0 टक्के शुद्ध असते.
  6. 916 हॉलमार्क सोने 91.6 टक्के शुद्ध असते
  7. 990 हॉलमार्क सोने 99.0 टक्के शुद्धतेची हमी देते
  8. 999 हॉलमार्क सोने हे 99.9 टक्के शुद्ध असते

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.