Gold Silver Price : सोन्याचा नवीन रेकॉर्ड! चांदीतही तेजी, काय आहे आजचा भाव

Gold Silver Price : आज सोन्याने जबरदस्त उसळी घेतली, भावात नवीन उच्चांक गाठला.

Gold Silver Price : सोन्याचा नवीन रेकॉर्ड! चांदीतही तेजी, काय आहे आजचा भाव
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 4:35 PM

नवी दिल्ली : दिवाळीनंतर सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहे. सोन्याने आज नवीन उच्चांक गाठला. सोन्याचे भाव (Gold Price Update) आज 57,000 रुपयांच्या पुढे पोहचले. तर मरगळ झटकून चांदीनेही आगेकूच केली आहे. गेल्या आठवड्यापासून चांदीत सातत्याने घसरण सुरु होती. चांदीला चमक आली आहे. चांदीचा भाव आज 68,000 रुपयांच्या (Silver Price Today) पुढे पोहचला. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने-चांदीच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली. त्याचा परिणाम स्थानिक सराफा बाजारात दिसून आला. सोन्याचा भाव लवकरच 60,000 रुपयांचा टप्पा ओलांडणार असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

वायदे बाजारात (Multi Commodity Exchange – MCX) सोन्याच्या भावात 0.45 टक्क्यांची वाढ झाली. सोने आज 57071 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करत आहे. तर चांदीच्या भावात 0.55 टक्क्यांची वाढ झाली. 24 जानेवारी 2023 रोजी चांदी 68,340 रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात जोरदार तेजी दिसून आली. सोन्याच्या दरात 0.2 टक्क्यांची वाढ दिसून आली. सोने 1,935.69 डॉलर प्रति औसवर व्यापार करत होते. तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली. आज चांदीच्या दरात 0.4 टक्क्यांची वाढ होऊन भाव 23.54 डॉलर प्रति औसवर पोहचला.

हे सुद्धा वाचा

येत्या काही दिवसात सोने प्रति 10 ग्रॅम 60,000 रुपये भाव गाठेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मद्रास ज्वेलर्स अँड डायमंड मर्चेंट्स असोसिएशन नुसार 24 कॅरेट सोने लवकरच 60,000 रुपयांचा दर गाठेल.  गुंतवणूकदारांचा त्यामुळे मोठा फायदा होणार आहे.

ibja केंद्र सरकारने घोषीत केलेल्या सुट्यांच्या दिवशी, शनिवार आणि रविवारी दर जाहीर करत नाही. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या किरकोळ भाव जाणून घेण्यासाठी ग्राहकांना 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. याशिवाय एसएमएस करुनही किंमती माहिती करुन घेता येईल.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बेस इंपोर्ट प्राईसमध्ये (Base Import Price) वाढ केली आहे. तर चांदीवरील बेस इंपोर्ट प्राईस घटवली. त्याआधारे सोने-चांदी आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कर आकारण्यात येईल.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.