Russia Ukraine war : रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) तणाव वाढत चालला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनसोबत लष्करी कारवाईची घोषणा केली. त्यानंतर युक्रेनची राजधानी कीवमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटाचे आवाज येत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. रशिया आणि युक्रेनमधील तणावाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा परिणाम दिसून येत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसताना दिसत आहे. या युद्धाचा परिणाम भारतीयांचा खिशाला बसणार आहे. इंधन दरवाढीसोबत, गॅसची भाववाढ होण्याची चिन्ह आहे. कच्चा तेलाच्या किंमती वाढल्यामुळे सोने (Gold), चांदीचे भाव वधारले आहेत. बिजनेस टुडेने केल्या सर्व्हेनुसार पुढील दोन वर्षांत सोन्याचे भाव गगणाला भिडणार आहे. याचा परिणाम सोने खरेदी करणे हे सर्वसामान्यांना कठिण जाणार आहे.
रशिया आणि युक्रेनमधील तणावाचा मोठा फटका हा जागतिक अर्थव्यवस्थेला पडला आहे. या तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी आली आहे. तसंच उच्च चलनवाढ या दोन्ही गोष्टींचा परिणाम सोन्याचा भाव वधारण्यात झाला आहे, असा रिपोर्ट बिजनेस टुडेने दिला आहे. तर दरवर्षी सोन्याची किंमत 55 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. तर 2023मध्ये सोन्याचा भाव 62 हजारांपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज आहे. गुरुवारी भारतीय बाजारपेठांमध्ये MCXवर सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅमवर 1,400 रुपयांनी वाढली. त्यामुळे सोनं गुरुवारी 51,750 रुपयांपर्यंत पोहोचलं.
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध ही एक भू-राजकीय घटना आहे. याचा परिणाम रशिया आणि युरोपियन आणि नाटो देशांमध्येही युद्ध होण्याची शक्यता आहे. तसंच या घटनेमुळे जगभरात आर्थिक मंदी आणि महागाईचं सावट पाहिला मिळणार आहे, असं निर्मल बंगमधील वस्तू संशोधन विभागाचे प्रमुख कुणार शाह यांचं म्हणं आहे.
या युद्धाचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थेवर होणार आहे. त्यामुळे यापुढे मध्यवर्ती बँका त्यांचे व्याजदर वाढवू शकणार नाही. याचा परिणाम म्हणजे जगभरात पुन्हा चलनवाढ दिसून येईल, असं शाह म्हणाले. तर सोन्याची पुढील काही दिवसात झपाट्याने भाववाढ होताना दिसेल. यावर्षी म्हणजे 2022मध्ये सोने 54 ते 55 हजारांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. तर येत्या 2 वर्षात सोन्याच्या किंमतीत जवळपास 10 हजारांची वाढ होण्याची शक्यता शाह यांनी वर्तवली आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धा परिणामुळे सोन्याचा भाव वधारला. या युद्धामुळे कच्चा तेलाच्या किंमती वाढल्या. परिणामी जगभरात महागाई वाढली आणि ही महागाई रोखण्यासाठी बँका व्याजदर वाढवू शकतात. तर भारतीय शेअर बाजारातही मोठ्या प्रमाणात उलथापालथ दिसून आली. गुंतवणूकदार आता सोने खरेदी करु शकतात, त्यामुळे सोने सध्या भाव खात आहे.