मुंबई : सोन्याच्या (Gold) दरात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने वाढ होत होती. अखेर या दरवाढीला आज ब्रेक लागला आहे. आज सोन्याचे दर स्थिर आहेत. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार दहा ग्रॅम अर्थात प्रति तोळा 22 कॅरट सोन्याची किंमत आज 48 हजार 200 रुपये इतकी झाली आहे. तर शनिवारी देखील 22 कॅरट सोन्याची किंमत 48 हजार 200 इतकीच होती. सोन्याचे दर स्थिर आहेत मात्र दुसरीकडे चांदीच्या (silver) दरात किंचितशी घसरण झाली आहे. शनिवारी चांदीचे दर प्रति किलो सत्तर हजार रुपये इतके होते. आज त्यामध्ये घसरण होऊन ते प्रति किलो 68900 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला असून, काही दिवसांपूर्वी सोन्याच्या किमती चांगल्याच कडाडल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यामध्ये घसरण पहायला मिळाली. आज सोन्याचे दर स्थिर आहेत.
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48200 इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर 52,590 इतका आहे. पुण्यात आज 22 कॅरट सोन्याचा भाव 48300 इतका आहे, तर 24 कॅरट सोन्याची किंमत 52, 690 इतकी आहे. नागपूरमध्ये 22 आणि 24 कॅरट सोन्याचा प्रति तोळा दर अनुक्रमे 48250 आणि 52640 रुपये इतका आहे. तर चांदीचा दर प्रति किलो 70 हजार रुपये इतका आहे. मात्र दुसरीकडे चांदीच्या दरात किंचितशी घसरण झाली आहे. काल चांदीचे दर प्रति किलो 70 हजार रुपये होते आज त्यामध्ये घसरण होऊन ते 68900 रुपयांवर पोहोचले आहेत.
रशिया आणि युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम हा जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. युद्धामुळे कच्च्या तेलापासून ते खाद्यतेलापर्यंत सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. सोन्यासारख्या मौल्यवान धातुच्या किमती देखील वाढल्या आहोत. दरम्यान येत्या काळात त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. त्यामुळे सध्या सोन्यातील गुंतवणूक वाढताना दिसत आहे. सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात तेजी आल्याचे पहायला मिळत आहे.
Petrol,Diesel Price: आठवड्याभरात पाचव्यांदा दरवाढ, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
आजपासून आंतरराष्ट्रीय विमानांच्या नियमित उड्डाणास परवानगी; विदेशवारी स्वस्त होणार?
यात्रा ऑनलाइन लवकरच घेऊन येतेय स्वतः चे IPO, सेबी पुढे मांडला प्रस्ताव!