Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Rates Today : सोनं खरेदी करताय! त्यापूर्वी जाणून घ्या सोन्याचे दर, अंदाज बांधा आणि खरेदीला लागा!

मराठी नववर्षाला सुरुवात झालीय. नववर्ष आलं आलं की लोक वर्षभरातील ताळेबंद बांधायला सुरुवात करतात. सोनं खरेदीसाठी सोनं-चांदीच्या किंमतीवरही लक्ष ठेवतात. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोनं-चांदीचे दर आणि किंमतींच्या चढ-उताराविषयी...

Gold Price Rates Today : सोनं खरेदी करताय!  त्यापूर्वी जाणून घ्या सोन्याचे दर, अंदाज बांधा आणि खरेदीला लागा!
सोन्याशी निगडित महत्त्वाची बातमीImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 1:43 PM

मुंबई : मराठी नववर्षाला सुरुवात झालीय. नववर्ष (Marathi New Year) आलं की लोक वर्षभरातील ताळेबंद बांधायला सुरुवात करतात. ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्यांचा अंदाज बांधू लागतात, त्यासाठी वेगळे पैसे बाजूला ठेवतात. विशेष म्हणजे महिला दरवर्षी यंदा कोणता नवीन अलंकार करायचा यासाठी आग्रही असतात. त्यासाठी सोनं-चांदीच्या किंमतीवर देखील त्या लक्ष ठेवतात.  सोनं (Gold Price) आणि चांदीच्या दरांची (Rates) माहिती असली की अंदाज बांधता येतो, आपल्याकडे खरेदीसाठी असलेल्या पैशांचा अवाकाही येतो. त्यासाठीच आम्ही तुम्हाला तुमच्या शहरातील सोनं-चांदीचे दर सांगणार आहोत. तसेच सोप्या भाषेत सोनं-चांदीच्या दरांतील चढ-उतार देखील अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजून घेता येईल. हे जाणून घेतल्यास तुम्हाला सोनं-चांदीची खरेदी सहज करता येईल. गुड रिटर्न्स या वेबसाईच्या माहितीनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 800 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52 हजार 140 रुपये प्रति तोळा इतका आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे दर

पाहा तुमच्या शहरातील सोन्याचे दर

शहर 22 कॅरेट सोन्याचे दर (प्रति तोळा)24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति तोळा)
मुंबई47,800 रुपये52,140 रुपये
पुणे47,850 रुपये52,190 रुपये
नागपूर47,850 रुपये52,190 रुपये
नाशिक 47,850 रुपये52,190 रुपये
दिल्ली48,030 रुपये52,400 रुपये
चेन्नई48,030 रुपये52,400 रुपये
बंगळुरू47,800 रुपये52,140 रुपये
हैदराबाद47,800 रुपये52,140 रुपये
लखनऊ47,950 रुपये52,290 रुपये
सुरत47,880 रुपये5रुपये2,220

दरांवर युद्धाचे परिणाम

युक्रेन आणि रशियामध्ये चालू असलेल्या युद्धाचे परिणाम सोनं-चांदीच्या दरांवर होऊ शकतात. युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबल्यास सोनं आणि चांदीचे दर कमी होऊ शकतात, असं जाणकारांचं मत आहे.

अमेरिकेचं व्याजदर देखील महत्वाचं

सोन्याच्या दरात अमेरिकेतील व्याज दर देखील महत्वपूर्ण आहे. जर अमेरिकेची फेडरल रिझर्व बॅक व्याज दर वाढवायला सुरुवात करते. त्यावेळेस सोन्यातील पैसा अमेरिका बाँडमध्ये जायला लागतो. यामुळे सोन्याचा दर कमी होऊ शकतो. असं असलं तरी सध्या अमेरिकेत असं वाातवरण नाही. मात्र, महागाईची मोठी चिंता आहे. महागाईच्या आकड्यांवर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. जर कुणी सोन्यामध्ये गुंतवणूक करणार असेल तर त्यांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं.

डॉलवरही ठेवा नजर

सोन्याचा दर डॉलर आणि भारतीय रुपयाच्या पडझडीवर देखील अवलंबून असतो. भारतात सोन्याची आयात केली जाते. यातच रुपयाची पडझड झाली तर सोन्याच्या दरांमध्ये फरक पडतो. अनेकदा ऐन सणासुदीच्या काळातही सोन्याच्या किंमती वाढतात. त्याही वेळेस डॉलर आणि रुपयातील पडझडीकडे लक्ष द्यायला हवं.

सोन्याच्या दरातील पडझड

आंतराराष्ट्रीय पातळीवरील युद्धस्थितीमुळे सोनं-चांदीच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला 8 मार्चपर्यंत सोन्याचे भाव काहीसे वाढले होते. 55,155 रुपये प्रति तोळा असे 24 कॅरेट सोन्याचे दर त्यावेळी होते. त्यानंतर सातत्याने सोन्याच्या दरात घसरण होत गेली.  22 ते 28 मार्च पर्यंत पुन्हा दरात वाढ झाली आणि 29 मार्चला सोन्याने 52,215 रुपये प्रति तोळा एवढी निचांकी पातळी गाठली होती.

इतर बातम्या

जन्मभराच्या नात्याला विम्याच्या संरक्षणासह परताव्याचे वचन, दरमहा 2200 रुपये करा जमा अन् कालावधी संपल्यानंतर दहा लाखांचा परतावा घ्या

चंद्रपुरातील पवनपार, मरेगाव, गुंजेवाहीतील सापडलेल्या वस्तू सारख्याच; जिल्हा प्रशासनाने ISRO दिले पत्र

Vinayak Mete: लग्न एकाशी अन् संसार दुसऱ्याशी ही महाराष्ट्राची शोकांतिका, विनायक मेटेंचा हल्लाबोल, राज ठाकरेंच्या सुरात सूर मिसळण्याचे संकेत काय?

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.