मुंबई : मराठी नववर्षाला सुरुवात झालीय. नववर्ष (Marathi New Year) आलं की लोक वर्षभरातील ताळेबंद बांधायला सुरुवात करतात. ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्यांचा अंदाज बांधू लागतात, त्यासाठी वेगळे पैसे बाजूला ठेवतात. विशेष म्हणजे महिला दरवर्षी यंदा कोणता नवीन अलंकार करायचा यासाठी आग्रही असतात. त्यासाठी सोनं-चांदीच्या किंमतीवर देखील त्या लक्ष ठेवतात. सोनं (Gold Price) आणि चांदीच्या दरांची (Rates) माहिती असली की अंदाज बांधता येतो, आपल्याकडे खरेदीसाठी असलेल्या पैशांचा अवाकाही येतो. त्यासाठीच आम्ही तुम्हाला तुमच्या शहरातील सोनं-चांदीचे दर सांगणार आहोत. तसेच सोप्या भाषेत सोनं-चांदीच्या दरांतील चढ-उतार देखील अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजून घेता येईल. हे जाणून घेतल्यास तुम्हाला सोनं-चांदीची खरेदी सहज करता येईल. गुड रिटर्न्स या वेबसाईच्या माहितीनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 800 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52 हजार 140 रुपये प्रति तोळा इतका आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे दर
शहर | 22 कॅरेट सोन्याचे दर (प्रति तोळा) | 24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति तोळा) |
---|---|---|
मुंबई | 47,800 रुपये | 52,140 रुपये |
पुणे | 47,850 रुपये | 52,190 रुपये |
नागपूर | 47,850 रुपये | 52,190 रुपये |
नाशिक | 47,850 रुपये | 52,190 रुपये |
दिल्ली | 48,030 रुपये | 52,400 रुपये |
चेन्नई | 48,030 रुपये | 52,400 रुपये |
बंगळुरू | 47,800 रुपये | 52,140 रुपये |
हैदराबाद | 47,800 रुपये | 52,140 रुपये |
लखनऊ | 47,950 रुपये | 52,290 रुपये |
सुरत | 47,880 रुपये | 5रुपये2,220 |
युक्रेन आणि रशियामध्ये चालू असलेल्या युद्धाचे परिणाम सोनं-चांदीच्या दरांवर होऊ शकतात. युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबल्यास सोनं आणि चांदीचे दर कमी होऊ शकतात, असं जाणकारांचं मत आहे.
सोन्याच्या दरात अमेरिकेतील व्याज दर देखील महत्वपूर्ण आहे. जर अमेरिकेची फेडरल रिझर्व बॅक व्याज दर वाढवायला सुरुवात करते. त्यावेळेस सोन्यातील पैसा अमेरिका बाँडमध्ये जायला लागतो. यामुळे सोन्याचा दर कमी होऊ शकतो. असं असलं तरी सध्या अमेरिकेत असं वाातवरण नाही. मात्र, महागाईची मोठी चिंता आहे. महागाईच्या आकड्यांवर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. जर कुणी सोन्यामध्ये गुंतवणूक करणार असेल तर त्यांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं.
सोन्याचा दर डॉलर आणि भारतीय रुपयाच्या पडझडीवर देखील अवलंबून असतो. भारतात सोन्याची आयात केली जाते. यातच रुपयाची पडझड झाली तर सोन्याच्या दरांमध्ये फरक पडतो. अनेकदा ऐन सणासुदीच्या काळातही सोन्याच्या किंमती वाढतात. त्याही वेळेस डॉलर आणि रुपयातील पडझडीकडे लक्ष द्यायला हवं.
आंतराराष्ट्रीय पातळीवरील युद्धस्थितीमुळे सोनं-चांदीच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला 8 मार्चपर्यंत सोन्याचे भाव काहीसे वाढले होते. 55,155 रुपये प्रति तोळा असे 24 कॅरेट सोन्याचे दर त्यावेळी होते. त्यानंतर सातत्याने सोन्याच्या दरात घसरण होत गेली. 22 ते 28 मार्च पर्यंत पुन्हा दरात वाढ झाली आणि 29 मार्चला सोन्याने 52,215 रुपये प्रति तोळा एवढी निचांकी पातळी गाठली होती.
इतर बातम्या