Gold Rate Today : सोने झाले स्वस्त, चांदी स्थिर, आजचे भाव काय

Gold Rate Today : सराफा बाजारात सोन्याचा भावात घसरण झाल्याने खरेदीदारांना सूखद धक्का बसला.

Gold Rate Today : सोने झाले स्वस्त, चांदी स्थिर, आजचे भाव काय
आजचे भाव काय
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 4:40 PM

नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात (Sarafa Market) आज 18 जानेवारी 2023 रोजी, बुधवारी सोन्याच्या भावात (Gold Price Today) घसरण दिसून आली. तर चांदीच्या दरात कुठलाही बदल झाला नाही. सध्या सोन्याच्या किंमती 56 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहेत. तर चांदीचा भाव (Silver Price Today) 69 हजार रुपये प्रति किलोहून अधिक आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्ध 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,605 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 68,661 रुपये किलो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) मंदी, कोरोना, युद्ध याशिवाय इतर मुद्यांचा मोठा प्रभाव असल्याने सोने-चांदीची मागणी वाढली आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वैलर्स असोसिएशन (India Bullion And Jewellers Association) नुसार, मंगळवारी संध्याकाली 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भावा 56,752 रपये प्रति 10 ग्रॅम होता. आज सकाळी हा भाव 56,605 रुपये होता. यावरुन सोन्याच्या किंमती स्वस्त झाल्या तर चांदीचा दर स्थिर असल्याचे स्पष्ट होत आहे.

असोसिएशनच्या ibjarates.com या संकेतस्थळानुसार, आज सकाळी 995 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा भाव घसरला आणि तो 56,378 रुपयांवर पोहचला. तर 916 शुद्ध सोने आज 51,850 रुपयांवर पोहचले. सोन्यात आज शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत घसरण दिसून आली. तर चांदीच्या किंमती स्थिर होत्या.

हे सुद्धा वाचा

750 शुद्ध सोन्याच्या भावात घसरण झाली, सोने 42,454 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आले. 585 शुद्ध सोन्याचा भाव अजून स्वस्त झाला. दहा ग्रॅम सोन्याची किंमत 33,114 रुपयांवर आली. तर 999 शुद्ध एक किलो चांदीची किंमत 68,661 रुपये होती.

ibja केंद्र सरकारने घोषीत केलेल्या सुट्यांच्या दिवशी, शनिवार आणि रविवारी दर जाहीर करत नाही. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या किरकोळ भाव जाणून घेण्यासाठी ग्राहकांना 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. याशिवाय एसएमएस करुनही किंमती माहिती करुन घेता येईल.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बेस इंपोर्ट प्राईसमध्ये (Base Import Price) वाढ केली आहे. तर चांदीवरील बेस इंपोर्ट प्राईस घटवली. त्याआधारे सोने-चांदी आयात करणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांवर कर आकारण्यात येणार आहे.

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो.

वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.