Loan, processing fee : गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी गूड न्यूज, ‘या’ बँकेच्या व्याजदरांत घट; खरेदीची सुवर्णसंधी
विशिष्ट मुदतीसाठी ही सवलत कर्जदारांना उपलब्ध होणार आहे. नव्या नियमानुसार, बँक ऑफ बडौदाचे गृहकर्ज (HOME LOAN) आता 6.75 टक्क्यांऐवजी 6.50 टक्क्यांनी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांना सुवर्णसंधी असल्याचे बँक ऑफ बडौदाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील अग्रणी बँक ऑफ बडोदाने (BANK OF BARODA) गृह कर्जातील व्याज दरात कपातीचा निर्णय घेतला आहे. विशिष्ट मुदतीसाठी ही सवलत कर्जदारांना उपलब्ध होणार आहे. नव्या नियमानुसार, बँक ऑफ बडौदाचे गृहकर्ज (HOME LOAN) आता 6.75 टक्क्यांऐवजी 6.50 टक्क्यांनी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांना सुवर्णसंधी असल्याचे बँक ऑफ बडौदाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. कर्जदारांच्या क्रेडिट प्रोफाईल संबंधित ही योजना आहे. येत्या 30 जून 2022 पर्यंत ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. गेल्या काही महिन्यांत घराच्या विक्रीत (HOME BYUING) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गृह कर्ज घेणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. व्याज दरातील सवलतीसाठी पात्र ठरणाऱ्यांची निकष सूची बँकेने जारी केली आहे.
सवलतीचे निकष
गृह कर्ज आणि बॅलन्स ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज करणाऱ्यांना ग्राहकांसाठीच ही मुभा असणार आहे. तसेच सवलतीचा लाभ घेण्यासाठी सिबिल स्कोअरच बंधन मात्र असणार आहे. बँकेने एक एप्रिल 2022 पासून व्याजदरात वाढीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा फेररचना करण्याचे ठरवलं आहे.
एमएलसीआर वाढ
बँक ऑफ बडौदाने एमसीएलआर दरांत वाढ केली होती. बँकेने 12 एप्रिल 2022 पासून एमसीएलआर मध्ये 0.05 टक्के वाढीचा निर्णय घेतला होता. यासोबतच एक वर्षाच्या कालावधीसाठी एमएलसीआर 7.35 टक्क्यांवर पोहोचला होता. नव्याने कर्ज घेणाऱ्यांसाठी किंवा सध्याच्या कर्जदारांवर एमसीएलआर मधील वाढीचा परिणाम होतो.
व्याजदरासोबत ‘हे’ महत्वाचे
अर्जदारांनी गृह कर्ज घेताना व्याज दरा व्यतिरिक्त अन्य बाबींकडे लक्ष द्यायला हवं. अन्य शुल्क कर्ज रकमेवर मोठा परिणाम करतात. त्यामुळे कर्जदाराला पुरेशी माहिती नसल्यास मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो.
- अर्ज शुल्क- कर्ज प्रकरणाची प्रारंभिक पडताळणी करण्यासाठी सर्व बँका किंवा किंवा कर्ज आस्थापनांकडून शुल्क आकारले जाते.
- प्रक्रिया शुल्क – कर्जदाराची क्रेडिट प्रोफाइल, उत्पन्न आणि गृह कर्ज योजनेवर आधारित प्रक्रिया शुल्क ठरते. बँक किंवा वित्तीय आस्थापनांच्या निहाय प्रक्रिया शुल्क भिन्न असते.
- फोरक्लोजर शुल्क- विहित कालावधीपूर्वी गृह कर्ज भरल्यानंतर बँक किंवा वित्तीय आस्थापने फोरक्लोजर शुल्क आकारतात.
इतर बातम्या
Special Report | 5 विरोधकांचा मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांना चौफेर घेराव
Reliance : रिलायन्स-फ्यूचर डील रद्द, 24 हजार कोटींचा व्यवहार बासनात; बँकाचा विरोध