‘कोटक महिंद्राच्या’ ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; बँकेकडून बचत खात्यावरील व्याज दरात वाढ, जाणून घ्या नवे दर

कोटक महिंद्रा बँकेकडून बचत खात्यावरील व्याज दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. नवे व्याज दर येत्या 13 जूनपासून लागू होणार आहेत.

'कोटक महिंद्राच्या' ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; बँकेकडून बचत खात्यावरील व्याज दरात वाढ, जाणून घ्या नवे दर
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 10:01 AM

मुंबई : कोटक महिंद्रा बँकेकडून (Kotak Mahindra Bank) बचत खात्यावर (Savings Account) मिळणाऱ्या व्याज दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. पूर्वी कोटक महिंद्र बँकेकडून बचत खात्यावर 3.50 टक्के व्याज देण्यात येत होते. आता त्यामध्ये पन्नास बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आल्याने व्याज दर 4,टक्क्यांवर पोहोचला आहे. याबाबत बोलताना बँक (Bank) व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले की, बँकेने बचत खात्यावर देण्यात येणाऱ्या व्याज दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे व्याज दर येत्या 13 जून, 2022 पासून लागू होतील. मात्र बँकेकडून वाढवण्यात आलेल्या व्याज दरांचा फायदा केवळ त्याच ग्राहकांना मिळणार आहे, ज्या ग्राहकांच्या खात्यात 50 लाखांपेक्षा अधिक रक्कम असेल. ज्या ग्राहकांच्या खात्यात पन्नास लाखांपेक्षा कमी रक्कम असेल त्यांना आपल्या ठेवीवर पूर्वीप्रमाणेच 3.50 टक्के व्याज मिळणार आहे.

इतर बँकांपेक्षा अधिक व्याज दर

कोटक महिंद्रा बँकेकडून बचत खात्यावरील व्याज दरात 50 बेसीस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. मात्र याचा फायदा अशाच ग्राहकांना होणार आहे. ज्यांच्या खात्यात पन्नास लाखांपेक्षा अधिक रक्कम असेल. दरम्यन दुसरीकडे प्रमुख खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक Axis Bank यांनी आपल्या व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. या बँकांकडून आपल्या ग्राहकांना पन्नास लाखांपर्यंतच्या ठेवींवर तीन टक्के व्याज दर दिला जातो. तर पन्नास लाखांपेक्षा अधिक रक्कम असेल तर त्यावर साडेतीन टक्के एवढे व्याज देण्यात येत आहे. याचाच अर्थ कोटक महिंद्रा बँकेकडून सध्या इतर बँकांच्या तुलनेत अधिक व्याज मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

कर्ज महागले

बुधवारी भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आरबीआयने रेपो रेट वाढवताच अनेक बँकांनी आपल्या व्याज दरात वाढ केली आहे. व्याज दरात वाढ करण्यात आल्याने गृह कर्जासह इतर सर्वच प्रकारचे कर्ज महाग झाली आहेत. तसेच ईएमआयमध्ये देखील वाढ झाली आहे. महागाई कमी करण्यासाठी रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्याचे आरबीआयच्या वतीने सांगण्यात आले. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली असून, रेपो रेट 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.