खूशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यात वाढ, 1 एप्रिलपासून निर्णयाची अंमलबजावणी
एक एप्रिलपासून वाहतूक भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे.
मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी (Government employees) आणि शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. (Teachers) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि शिक्षकांच्या वाहतूक भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. एक एप्रिलपासून वाहतूक भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे. नव्या वाढीनुसार आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना किमान 675 ते 5400 रुपये वाहतूक भत्ता मिळणार आहे. वाहतूक भत्त्यात वाढ करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) राज्य कर्मचारी, झेडपी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ही वाढ मिळणार आहे. एक जानेवारी 2016 पासून केंद्राने सातवा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र सातव्या वेगन आयोगानुसार केंद्राने वाहतूक भत्त्यात केलेली वाढ, राज्य कर्मचाऱ्यांना दिली नव्हती. मात्र आता एक एप्रिलपासून कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.
लाभ कोणाला मिळणार?
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि शिक्षकांच्या वाहतूक भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. एक एप्रिलपासून वाहतूक भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे. नव्या वाहतूक भत्ता वाढीनुसार आता राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना किमान 675 ते 5400 रुपये वाढीव भत्ता मिळणार आहे. लाभ मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये राज्य कर्मचारी, झेडपी अधिकारी , कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कर्मचाऱ्यांकडून निर्णयाचे स्वागत
सातव्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना 675 ते 5400 रुपये वाहतूक भत्ता मिळणार आहे. अनेक दिवसांपासून कर्मचारी वाहतूक भत्ता वाढीच्या प्रतिक्षेत होते. अखेर वाहतूक भत्ता वाढीचा निर्णय घेण्यात आल्याने, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सरकारच्या या निर्णयाचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. एक एप्रिलपासून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव वाहतूक भत्त्यानुसार पैसे मिळणार आहेत.