Aadhaar Card बाबत आनंदवार्ता, आता असा होईल नागरिकांना फायदा
Free Aadhaar Card Update : आधार कार्ड अपडेट केले नसेल तर आता नागरिकांना अजून दिलासा देण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख सातत्याने वाढत आहे. आता नागरिकांना आधार अपडेट करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.
नागरिकांना आधार कार्ड अपडेट करण्यासाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नागरिकांना आधार कार्डसंदर्भात आनंदवार्ता आली आहे. आधार कार्ड अपडेटसाठी कागदपत्रं अपलोड करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाव बदलण्यासाठी राजपत्र मात्र अनिवार्य करण्यात आले आहे. घोळ टाळण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आले आहे. जन्म तारीख दुरूस्त करण्यासाठी जवळच्या आधार केंद्रावर जावं लागणार आहे.
अशी वाढत गेली मुदत
आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची यापूर्वीची तारीख 14 मार्च अशी होती. त्याला 14 जून, 2024 रोजीपर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. ही अंतिम मुदत जवळ येताच त्यात पु्न्हा एकदा वाढ झाली. 14 सप्टेंबर 2024 रोजीपर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत देण्यात आली होती. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ही मुदत पुन्हा दोनदा वाढवली. आता ही तारीख 14 डिसेंबर अशी करण्यात आली आहे. नागरिकांना या काळात आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन सुविधेचा लाभ घेता येईल. ही मोफत सेवा केवळ myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा अधिक जुने असेल आणि अजून ते अपडेट केले नसेल तर अपडेट करण्यासाठी ही संधी आहे.
नावात बदलासाठी आता राजपत्र
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गॅझेट आवश्यक आहे. याविषयी UIDAI ने नवा निर्णय घेतला आहे. नावातील बदलाविषयी आता कडक भूमिका घेण्यात आली आहे. नावातील बदलाआधारे मोठा घोटाळा होण्याची शक्यता लक्षात घेत राजपत्र आवश्यक करण्यात आले आहे. आता नावात बदलासाठी राजपत्र सादर करावं लागणार आहे.
या पोर्टलवर करा आधार कार्ड अपडेट
या निर्णयामुळे नागरिकांना कागदपत्रांआधारे myAadhaar पोर्टल https://myaadhaar.uidai.gov.in/ च्या माध्यमातून 14 जूनपर्यंत मोफत बदल करण्यात येणार आहे. आधार कार्डमधील हा बदल केवळ ऑनलाईन अपडेशनसाठी आहे. पण तुम्ही आधार केंद्रावर जाऊन कागदपत्रांआधारे आधार कार्डमध्ये बदल कराल तर त्यासाठी 25 रुपये शुल्क अदा करावे लागेल.
असे करा आधार कार्ड अपडेट
UIDAI च्या https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा
अथवा https://ssup.uidai.gov.in/ssup/ यावर लॉगिन करा
12 अंकांचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन व्हा
ओटीपीचा पर्याय निवडा, पुढील प्रक्रिया करा
आधार संबंधीत मोबाईल क्रमांकावर हा ओटीपी येईल
ओटीपी टाकून ‘अपडेट आधार ऑनलाइन’ हा पर्याय निवडा
‘प्रोसीड टू अपडेट आधार’ हा पर्याय निवडा, माहिती भरा