Google Pay : युझर्ससाठी जबरदस्त फीचर, ॲपवर आता विना पिन करा ट्रान्झक्शन

Google Pay : गुगल पे वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट समोर आले आहे. युझर्ससाठी गुगलने जबरदस्त फीचर आणले आहे. त्यामुळे विना पिन त्यांना इतक्या रुपयांचा व्यवहार बिनदिक्कतपणे करता येईल..

Google Pay : युझर्ससाठी जबरदस्त फीचर, ॲपवर आता विना पिन करा ट्रान्झक्शन
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 4:14 PM

नवी दिल्ली : गुगल पे वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट समोर आले आहे. युझर्ससाठी गुगलने जबरदस्त फीचर आणले आहे. युपीआय पेमेंट प्लॅटफॉर्म गुगलपेने (Google Pay) युझर्ससाठी मोठी सोय केली आहे. त्यामुळे युझर्सला युपीआय पेमेंट करणे अधिक सोपे झाले आहे. या फिचरच्या वापरामुळे एक निश्चित रक्कम त्यांना हस्तांतरीत करता येईल. त्यासाठी त्यांना पिनचा अडथळा नसेल. युझर्सला विना पिन त्यांना इतक्या रुपयांचा व्यवहार बिनदिक्कतपणे करता येईल. आरबीआयच्या पुढाकाराने अनेक युपीआय पेमेंट प्लॅटफॉर्म (UPI Payment Platform) अशी सुविधा देत आहेत.

विना पिन करा पेमेंट दैनंदिन चीजा खरेदीसाठी, कमी किंमतीच्या वस्तू खरेदीसाठी या फीचरचा वापर करता येईल. गुगल पे युझर्ससाठी युपीआय पेमेंट करणे आता अधिक सोपे झाले आहे. कंपनीने त्यांच्या ॲपवर युपीआय लाईट (UPI Lite) फीचर सुरु केले आहे. आता युझर्स विना पिन (UPI PIN) 200 रुपयांपर्यंतचे पेमेंट सहज करु शकतील. नुकतेच पेटीएम (Paytm) आणि फोनपे (PhonePe ) ने या फीचरची सुरुवात केली आहे.

युपीआय लाईटचा वापर युपीआय लाईट सप्टेंबर 2022 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कमी मूल्याधारीत युपीआय पेमेंट गतीने आणि सहज करण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसीत केले आहे. युपीआय लाईटच्या मदतीने दररोजचे छोटे-छोटे व्यवहार एकाच क्लिकमध्ये सहज करता येतात.

हे सुद्धा वाचा

200 रुपयांपर्यंतचे व्यवहार विना पिन तुम्हाला मोबाईलमध्ये गुगलचे हे लाईट व्हर्जन डाऊनलोड करावे लागेल. युपीआय लाईट वॉलेट युझर्सला याच्या मदतीने 200 रुपयांपर्यंतचे तात्काळ पेमेंट करता येईल. 200 रुपयांपर्यंतच्या व्यवहारासाठी कोणताही पिन देण्याची गरज नाही. यामुळे पेमेंटची प्रक्रिया सोपी आणि गतिमान होईल. एकावेळी या प्लॅटफॉर्मवर दोन हजार रुपये जमा करता येतील. 24 तासात तुम्हाला युपीआय लाईटच्या माध्यमातून 4 हजार रुपये खर्च करता येतील.

असे करा Google Pay ॲक्टिव्ह

  • मोबाईलमध्ये जाऊन प्ले स्टोअरमध्ये जा
  • या ठिकाणी Google Pay ॲप उघडा
  • ॲपच्या होम स्क्रीनवर सर्वात वरच्या उजव्या बाजूला प्रोफाईल पिक्चरला क्लिक करा
  • त्यानंतर UPI Lite Pay Pin Free वर क्लिक करा आणि पुढील निर्देशांचे पालन करा
  • पैसा जमा करण्यासाठी तुमचे योग्य बँक खाते निवडा, जे UPI Lite सपोर्ट करेल
  • युपीआय पिन टाकल्यानंतर युपीआय लाईट खाते ॲक्टिव्ह होईल
  • Google Pay वर केवळ एकच UPI Lite खाते तयार करता येईल

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.