Google Pay New Service | आता फक्त करा टॅप, पेमेंट होईल आपोआप, QR Code स्कॅनला ही लवकरच टाटा, काय आहे नवे फीचर?

Google Pay Tap to payment | दिवसागणिक तंत्रज्ञान प्रगत होत आहेत आणि सुलभ फीचर स्मार्टफोनच्या पदरात पडत आहेत. आता गुगल पेने असेच नवे फीचर आणले आहे.

Google Pay New Service | आता फक्त करा टॅप, पेमेंट होईल आपोआप, QR Code स्कॅनला ही लवकरच टाटा, काय आहे नवे फीचर?
एक टॅप आणि पेमेंट झटपटImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 1:01 PM

Google Pay Tap to pay news | आता सर्व व्यवहार युपीआय पेमेंटद्वारे (UPI Payment) करणारा एक मोठा वर्ग देशात रुजला आहे. व्यापाऱ्यांनीही त्याला प्रोत्साहन दिले आहे. दारावर येणारा भाजीवाला, चौकात उभा असलेला पाणीपुरीवाला सगळ्यांकडे आता युपीआय पेमेंटची वेगवेगळी साधनं उपलब्ध आहेत. फक्त क्युआर कोड स्कॅन (Scan QR Code) करा आणि व्यवहार पूर्ण करा, अशी सोय झाली आहे. आता त्याच्याही पुढे जाऊन, गुगल पेने वापरकर्त्यांसाठी टॅप टू पे (Tap To Pay) हे नवीन फिचर लाँच केले आहे. या फीचरमुळे वापरकर्ते कोणताही क्यूआर कोड स्कॅन न करता पेमेंट करू शकतात. यामुळे केवळ एका टॅपमध्ये पेमेंट करता येणार आहे. वापरकर्ता पीओएस मशीनवर (PoS Machine) स्मार्टफोन (Smart Phone)टॅप करून पेमेंट करू शकतो. अर्थात या फीचरसाठी स्मार्टफोनची आवश्यकता आहे. तुमच्या फोनमध्ये एनएफसी (NFC)ची सुविधा असेल तर हे फीचर विनासायस वापरता येईल. टॅप टू पे फिचर वापरकर्त्याला (Users) केवळ एका टॅपमध्येच व्यवहार पूर्ण करण्याची सोय करते.

काय आहे फीचर

  1. गुगल पेच्या (Google Pay) टॅप टू पे (Tap to Pay) या पर्यायाचा वापर करून यूपीआयच्या माध्यमातून निधी हस्तांतरित करता येईल. या फीचरबाबत कंपनीने सांगितलं की, पेमेंट सहज करता यावं यासाठी टॅप टू पे फीचर जारी करण्यात आलं आहे
  2. या पूर्वीच बँक कार्डवर हे वैशिष्ट्य आपण पाहिले असेल. वापरकर्ते पीओएस मशीनवर कार्ड टॅप करून पैसे देतात. सॅमसंग पेवर आधीपासूनच असेच पेमेंटचा पर्याय उपलब्ध आहे. गुगल पेने (Google Pay) पाइन लॅबच्या सहकार्याने हे फीचर लाँच केले आहे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. क्यूआर कोड स्कॅन (QR Code Scan) करण्याऐवजी किंवा यूपीआयशी लिंक्ड मोबाइल नंबर (Mobile Number) देण्याऐवजी पेमेंट करण्यासाठी वापरकर्त्यांना पीओएस टर्मिनलवर फोन टॅप करावा लागेल, असे गुगल पेने म्हटले आहे. यानंतर वापरकर्त्याला व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्याचा यूपीआय पिन टाकावा लागेल. त्यानंतर पेमेंट प्रक्रिया पूर्ण होईल
  5. गुगलने म्हटले आहे की ही कार्यक्षमता एनएफसी NFC – सक्षम अँड्रॉइड Android स्मार्टफोन असलेल्या कोणत्याही यूपीआय वापरकर्त्याला फायदेशीर ठरेल. वापरकर्ते देशभरातील पाइन लॅब अँड्रॉइड पीओएसवर त्यांच्या स्मार्टफोनवरून टॅप करतील आणि पैसे अदा करतील.
  6. हे फीचर वापरण्यासाठी, वापरकर्त्याला सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनमध्ये आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये एनएफसी ( NFC)तंत्रज्ञान सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये(Settings) जाऊन कनेक्शन सेटिंगमध्ये जावं लागेल. सेटिंग्जमध्ये हे फीचर तुम्हाला सहज मिळेल.
  7. तुमच्या फोनमध्ये एनएफसी असेल तर सर्च केल्यावर तुम्हाला त्याचा पर्याय दिसेल. तुम्ही ते सक्षम केल्यानंतर पुढे तुम्ही गुगल पेचं नवं फीचर वापरू शकता. यासाठी अगोदर तुम्हाला तुमचा फोन अनलॉक (Unlock) करावा लागेल.
  8. व्यवहार करतेवेळी पेमेंट टर्मिनलवर फोनवर टॅप करावं लागेल. सध्या हे फिचर फक्त पाइन लॅब टर्मिनलवर सुरु आहे. यामुळे सध्या ते पाइन लॅब टर्मिनलवरच काम करणार आहे.फोन टर्मिनलवरून टॅप करताच गुगल पे आपोआप ओपन होईल. त्यानंतर रक्कमेची खात्री केल्यानंतर पैसा अदा करण्याची प्रक्रिया एका टॅपवर होईल.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.