Post office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीसह कमाईची मोठी संधी, पोस्टाची योजनाच भारी

Post office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीसह जोरदार परतावा मिळावा, अशी तुमची इच्छा असेल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. अल्पबचत तुम्हाला काही दिवसातच लखपती करु शकते..

Post office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीसह कमाईची मोठी संधी, पोस्टाची योजनाच भारी
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 9:59 PM

नवी दिल्ली : अल्पबचत योजना सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांना मदत करतात आणि जोरदार परताव्याची हमी पण देतात. पद्धतशीर गुंतवणूक योजनेसारखी (SIP) गुंतवणूक केवळ म्युच्युअल फंडातच करता येते असे नाही तर अल्पबचत योजनेसाठी पण हा फंडा वापरता येतो. दरमहा गुंतवणूक केल्यास तुम्हाला काही वर्षानंतर जोरदार परतावा मिळतो. पब्लिक प्रोव्हिडंड फंडमध्ये (PPF) केलेली गुंतवणूक तुम्हाला मालामाल करते. आजच्या काळात पीपीएफ गुंतवणुकीसाठी एकदम चांगला पर्याय मानण्यात येतो. या योजनेत तुम्हाला चांगेल व्याज मिळते. त्याला जोरदार परतावा मिळतो. 15 वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेतील गुंतवणूक चांगला परतावा देते. या सरकारी योजनेत गुंतवणुकीवर हमीपात्र परतावा मिळतो. सध्या या योजनेत 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळते.

पीपीएफ योजनेचे खाते तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकता. या योजनेत व्याजदर हा इतर बचत योजनांमपेक्षा अधिक मिळते. ही योजना दीर्घकालीन उद्दिष्ट गाठण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरते. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार पीपीएफ योजनेत गुंतवणूक करतात.

एका आर्थिक वर्षात या योजनेत जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. तर कमीत कमी 500 रुपये गुंतविता येतात. जर तुम्हाला अधिक परतावा हवा असेल तर दर महा 12500 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदाराला मोठा फायदा मिळतो. 15 वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेतील गुंतवणूक चांगला परतावा देते. या सरकारी योजनेत गुंतवणुकीवर हमीपात्र परतावा मिळतो. सध्या या योजनेत 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळते.

हे सुद्धा वाचा

PPF योजनेवर 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळते. कित्येक बँकांच्या मुदत ठेवीवरील व्याजापेक्षा हा दर जास्त आहे. यामध्ये कंम्पाऊंडिंगचा फायदा मिळते. या योजनेत सिंगल अकाऊंट खाते उघडण्याची सोय आहे. लहान मुलांच्या नावे पण खाते उघडता येते. पीपीएफ खात्यात 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. पण तुम्हाला हा कालावधी 5-5 वर्षांसाठी वाढविता येतो. या योजनेतील गुंतवणूक ही कर सवलत पात्र असते. तुम्हाला कर सूट मिळविता येते. एवढंच नाही तर खात्याला एक वर्ष झाल्यानंतर तुम्हाला कर्ज सुद्धा मिळविता येते.

पीपीएफमधून रक्कम काढण्याचे नियम

  1. पीपीएफमधून रक्कम काढण्यासाठी तुम्हाला बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल
  2. पोस्ट खात्यात पीपीएफ खाते असेल तर टपाल कार्यालयात जावे लागेल
  3. बँकेतून अर्ज C डाऊनलोड करावा लागेल
  4. अर्ज भरल्यानंतर तो बँकेत जमा करावा
  5. पीपीएफ खात्याचा तपशील आणि संबंधिक कागदपत्रे जमा करा
  6. पीपीएफ खात्यात जमा केलेल्या रक्कमेपैकी 50 टक्के काढता येईल

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.