Twitter : ट्विटरचीच नाही तर सरकारची ही होणार कमाई..ब्लू टिकसाठी पैसे भरताना खिसा कुठे कापला लक्षात येणार..

Twitter : Blue Stick साठी केवळ ट्विटरला पैसे मोजताना तुम्हाला सरकारच्या तिजोरीचा भारही सहन करावा लागणार आहे.

Twitter : ट्विटरचीच नाही तर सरकारची ही होणार कमाई..ब्लू टिकसाठी पैसे भरताना खिसा कुठे कापला लक्षात येणार..
खिशावर पडणार भारImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 4:02 PM

नवी दिल्ली : Twitter खात्याचा पडताळा ( Account Verification) करण्यासाठी आता पैसे द्यावे लागणार हे तुम्हाला बातम्यातून कळलंच असेल. Blue Tick साठी वापरकर्त्याला साधारणतः 8 डॉलर शुल्क (Charge) अदा करावे लागेल. पण त्यापुढची बातमी तुम्हाला माहिती आहे का?

तर भारतीय चलनात वापरकर्त्यांना जवळपास 661 मोजावे लागणार आहे. एवढ्यावरच हे शुल्क प्रकरण थांबणार नाही. तर त्यापुढे जात तुम्हाला त्यावर 18 टक्के जीएसटीही (GST) मोजावा लागणार आहे.

आता तुम्ही म्हणाल,काहीही काय सांगता राव? पण आयटी सेवातंर्गत (सॉफ्टवेअर) GST द्यावा लागणार आहे. सर्व प्रकारच्या सॉफ्टवेअर सेवांसाठी 18% टक्के वस्तू आणि सेवा कर मोजावा लागतो.

हे सुद्धा वाचा

ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर एलन मस्क यांनी (Elon Musk) यांनी खात्याच्या पडताळासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. हे शुल्क 8 डॉलर प्रति महिना असेल. भारतात हे शुल्क कमी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

प्रत्येक देशातील वापरकर्त्यांच्या मिळकतीच्या हिशोबाने शुल्क आकारण्यात येईल असे Elon Muskयांनी स्पष्ट केले. यामुळे लोकांची ट्रोल आणि स्पॅमपासून सूटका होणार आहे.

Blue Tick असणाऱ्या वापरकर्त्यांना सर्च, रिप्लाय आणि मेन्शन यासारख्या सुविधेत प्राथमिकता देण्यात येणार आहे. त्यांना दीर्घ व्हिडिओ आणि ऑडियो पोस्ट करता येईल. भारतात ब्लू टिकसाठीचे शुल्क 200 ते 250 रुपये राहण्याची शक्यता आहे.

भारतात सध्या ट्विटरचे अडीच कोटी वापरकर्ते आहेत. भारत ट्विटरचा तिसरी मोठी बाजारपेठ आहे. सध्या तुम्ही ब्लू टिकची मागणी केली तर एका प्रक्रियेनंतर तुमच्या खात्याचा पडताळा होतो. तुमच्या नावासमोर ब्लू टिक लागते. पण आता ही सेवा सशुल्क असेल.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.