Vehicle Scrapping | खटारा गाडी करा स्क्रॅप, नवीन कार घेताना मिळेल एवढा फायदा..
Vehicle Scrapping | जर तुम्ही अजूनही 15 वर्षांहून जूनी कार वापरत असला तर ही बातमी तुमच्यासाठी. सरकारने तुमच्यासाठी खास स्क्रॅपिंग धोरण आणलं आहे. नवीन कार घेताना या धोरणाचा तुम्हाला खूप मोठा फायदा होईल.
Vehicle Scrapping | जर तुम्ही अजूनही 15 वर्षांहून जूनी कार (Car) वापरत असला तर ही बातमी तुमच्यासाठी. सरकारने तुमच्यासाठी खास वाहन स्क्रॅपिंग धोरण (Vehicle Scrapping) आणलं आहे. नवीन कार घेताना तुम्हाला खास डिस्काऊंट (Discount) तर मिळेतच. पण इतर सवलतीही मिळतात.
प्रत्येक जिल्ह्यात 3 केंद्र
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी स्क्रॅपिंग धोरण प्रभावीपणे राबवण्यासाठी नवीन घोषणा केली. त्यानुसार, आता देशातील प्रत्येक जिल्ह्यात 3 स्क्रॅपिंग केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांची धावपळ वाचणार आहे.
फिटनेस टेस्ट
स्क्रॅप पॉलिसीनुसार, (Vehicle Scrapping Policy) जून्या वाहनांची फिटनेस टेस्ट करण्यात येईल. त्यात इंजिनची क्षमता, इंधन कार्यक्षमता, सुरक्षा मानके यांची चाचणी करण्यात येईल.
तर नोंदणी रद्द
तुम्ही स्क्रॅप धोरणातंर्गत जून्या गाड्यांची चाचणी केली. चाचणीत वाहन नापास झाल्यास वाहनांची नोंदणी रद्द करण्यात येईल.
काय आहे धोरण
वाहन स्क्रॅप धोरणानुसार(Vehicle Scrapping Policy) 10 वर्षांहून जूने व्यावसायिक वाहन आणि 15 वर्षांहून जूने खासगी वाहनांची फिटनेस टेस्ट होईल.
तर वाढीव कालावधी
फिटनेस टेस्ट पास झाल्यास आणखी काही वर्षे वाहन चालवण्याची परवानगी देण्यात येते.
वाहन अनुत्तीर्ण झाल्यास..
या फिटनेस टेस्टमध्ये (Fitness Test) वाहन नापास झाल्यास तुम्हाला नोंदणीकृत स्क्रॅपिंग सेंटरवर वाहन जमा करावे लागेल. याठिकाणी वाहनधारकाला स्क्रॅपिंग प्रमाणपत्र देण्यात येते. ते 2 वर्षांसाठी मान्य असते.
नवीन कार खरेदी होणार स्वस्त
तुम्ही जूनी कार स्क्रॅपिंगसाठी दिल्यानंतर प्रमाणपत्राआधारे तुम्हाला अनेक फायदे मिळतात. एकतर प्रदूषण कमी करण्यासाठी तुम्ही मोलाची साथ दिलेली असते. नवीन वाहन खरेदीवर तुम्हाला 5 टक्के अतिरिक्त डिस्काऊंट मिळते. नवीन वाहनाच्या नोंदणीसाठी (Vehicle Registration Policy) एक रुपयाही द्यावा लागत नाही.
रस्ते वाहतूक करात सवलत
एवढेच नाहीतर राज्य सरकार खासगी वाहनधारकांना या धोरणातंर्गत 25 टक्के आणि व्यावसायिक वाहनधारकांना 15 टक्के रस्ते वाहतूक करात सवलत मिळते.