पुणे मार्गावर मुंबई- पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेष ट्रेनला पहिल्यांदाच जोडण्यात आलेल्या विस्टाडोम कोचला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. याचं बुकींग फुल्ल झालेलं पाहायला मिळालं.
एलएचबी रॅक आणि व्हिस्टाडोम कोचसह मुंबई- पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेष ट्रेनची पहिली फेरी 26 जूनपासून सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे या मार्गावर प्रथमच व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे ज्यामुळे प्रवाशांना निसर्गरम्य सौंदर्याचा आणि अनुभवाचा आनंद लुटता आला. व्हिस्टाडोम कोचमधील सर्व 44 सीटस बुक होत्या.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्मवर कोचजवळ खास सेल्फी लावलेल्या सेल्फी पॉईंटवर प्रवाशांनी सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही.
या प्रसंगी प्रवाशांनी कोचच्या आतील भागाप्रमाणे दिसणारा केकही कापला.
या डब्याला सजावट करण्यात आली होती.