GST Council Meeting : महागाईसाठी तयार रहा! जीएसटी परिषद काय घेणार निर्णय

GST Council Meeting : जीएसटी परिषदेच्या काही निर्णयांनी सर्वसामान्यांचे बजेट वाढले. सीलबंद फूड आयटम, पीठ आणि इतर दैनंदिन वस्तूवर जीएसटी वाढविल्याने या वस्तू महागल्या होत्या. आता उद्या जीएसटी परिषद कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

GST Council Meeting : महागाईसाठी तयार रहा! जीएसटी परिषद काय घेणार निर्णय
आता काय महागणार
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 4:51 PM

नवी दिल्ली : जीएसटी परिषदेने (GST Council) दिवाळीनंतर घेतलेल्या काही निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या किचन बजेटवर परिणाम झाला होता. त्यांच्या खिशावर भार वाढला. सीलबंद फूड आयटम, पीठ आणि इतर दैनंदिन वस्तूवर जीएसटी वाढविल्याने या वस्तू महागल्या होत्या. पण 17 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या जीएसटी परिषदेने जीएसटी वाढविण्याचा निर्णय घेतला नव्हता. या वर्षातील जीएसटी परिषदेची पहिली बैठक 18 फेब्रुवारी, शनिवारी होत आहे. जीएसटी परिषदेची ही 49वी बैठक आहे. अर्थात अनेक वस्तूंवर जीएसटी लागू झाल्याने आणि त्यात वाढ झाल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जीएसटी बैठकीत बाजरी आणि त्यापासून उत्पादीत पदार्थांवरील जीएसटी कमी होण्याची शक्यता आहे. तर कही तज्ज्ञांच्या मते उघड्या बाजारात विक्री होत असलेल्या बाजरी व उत्पादनावरचा जीएसटी रद्द (GST Cancelled) होण्याची शिफारस करण्यात येऊ शकते. तर पान मसाल्याबाबतही मोठ्या घोषणा होऊ शकते. आता उद्या जीएसटी परिषद कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पान मसाला आणि गुटखा इंडस्ट्रीजला जीएसटी परिषद लगाम घालू शकते. कर चुकवेगिरी, कर चोरीला लगाम घालण्यासाठी मोठी घोषणा होऊ शकते. ओडिशाचे अर्थमंत्री निरंजन पुजारी यांच्या अध्यक्षतेखालील जीओएम च्या अहवालावर बैठकीत विचार होऊ शकतो.

जीएसटी परिषदेत सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. बाजारी आणि उत्पादनावरील कर कमी होऊ शकतो. बाजरीच्या पदार्थांवरील जीएसटी 18% टक्क्यांहून थेट 5% होण्याची शक्यता आहे. या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. खुल्या बाजारात विक्री होणाऱ्या बाजरीच्या पदार्थांवरील जीएसटी रद्द होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

डिसेंबरमध्ये (December) जीएसटी महसूलात 15 टक्क्यांची वाढ झाली असून ही रक्कम 1.49 लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. जीएसटीमध्ये सातत्याने वाढ होण्याची परंपरा अबाधित राहिली आहे.

जीएसटी महसूल 1.40 लाख कोटींहून अधिक असण्याचा डिसेंबर हा सलग 10 वा महिना ठरला आहे. नोव्हेंबर महिन्यात जीएसटी महसूल वार्षिक आधारावर नोव्हेंबर महिन्यात 11 टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. नोव्हेंबर महिन्यातही 1.46 लाख कोटींहून अधिकचा महसूल जमा झाला होता.

एप्रिल महिन्यात जीएसटीने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले होते. एकट्या एप्रिल महिन्यात केंद्र सरकारच्या तिजोरीत 1.68 लाख कोटी रुपये जमा झाले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात दुसऱ्यांदा सर्वाधिक जीएसटी जमा झाला होता.

काय होऊ शकते महाग?

बँकेचे चेक बूक

हॉटेल बुकिंग

रुग्णालयातील बेड

एलईडी लाईट्स, लँप्स

चाकू, ब्लेड, पेन्सिल, शार्पनर

किचनमधील स्टीलचे चमचे व साहित्य

पंप आणि मशीन

या वस्तू होतील स्वस्त?

सीलबंद अन्नपदार्थ

हॉटेलिंग, खाण्या-पिण्याच्या वस्तू

रोपवे राईड्स

ऑर्थोपेडिक मशीन

संरक्षण उत्पादने

स्टेशनरी वस्तू

सिमेंट

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.