नवी दिल्ली : तुम्ही नोकरदार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कंपनीद्वारे कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबियांसाठी ग्रूप इन्श्युरन्स पॉलिसी (GROUP INSURANCE POLICY) सुविधा उपलब्ध केली जाते. या सुविधेसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून काही भाग कपात केला जातो. झी बिझनेसच्या वृत्तानुसार, चालू आर्थिक वर्षात ग्रूप इन्श्युरन्स साठी तुमच्या खिशाला अधिक भार पडू शकतो. प्रीमियम महागल्यामुळे (PREMIUM INCREASE) ग्रूप टर्म इन्श्युरन्स साठी तुम्हाला अतिरिक्त 10-15 टक्के अदा करावे लागतात. अधिकतम कंपन्या ग्रूप इन्श्युरन्स साठी अधिक कपात करण्याच्या तयारीत आहे. कोविड प्रकोपामुळं क्लेमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे ग्रूप मेडिक्लेमसाठी (GROUP MEDICLAIM) प्रीमियम वाढविण्यासाठी हालचाली सुरू आहेत. तसेच वैद्यकीय खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कंपनी अतिरिक्त खर्चाची विभागणी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत करण्याच्या मानसिकतेत आहे.
ग्रूप इन्श्युरन्स व्यवसायात सरकारी जनरल इन्श्युरन्स कंपन्यांची भागीदारी 70 टक्क्यांहून अधिक आहे. ग्रूप टर्म लाईफ इन्श्युरन्स मध्ये करार स्वरुपात सर्व कर्मचाऱ्यांना कव्हर केले जाते. कंपनीचे इन्श्युरन्स कंपनीसोबत करार केला जातो. त्यानंतर कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना इन्श्युरन्स कव्हर प्रदान करते. ग्रूप टर्म इन्श्युरन्सचा लाभ कंपनीसोबत कर्मचारी कार्यरत असेपर्यंत मिळतो. राजीनामा दिल्यानंतर इन्श्युरन्स कार्यरत राहत नाही.
ग्रूप इन्श्युरन्स मध्ये संपूर्ण वर्षासाठी क्लेम न केल्यास नो क्लेम बोनसचा लाभ मिळतो. जर व्यक्तिगत पॉलिसी खरेदी केल्यास आणि क्लेम न केल्यास नो क्लेम बोनसचा लाभ मिळतो. पुढील वर्षीच्या तुमच्या प्रीमियम रकमेत कपात होते.
विमा कंपन्या प्रीमियम मध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहे. कोविड काळात दाव्यांची संख्या तीनशे पटींनी वाढली आहे. त्यामुळे दाव्यांची भरपाई करण्यासाठी कंपन्यांना कोट्यावधी रुपये खर्च करावे लागले आहे. त्यामुळे पॉलिसीला महागाईची झळ बसण्याची दाट शक्यता आहे.
इतर बातम्या
Video, Magic Moments : जोस बटलरनं तिसरं शतक झळकावलं, स्पेशल Highlight Video चुकवू नका
Mohit Kamboj car attack: कलानगरच्या सिग्नलवर नेमकं घडलं काय? मोहित कंबोज यांची पहिली प्रतिक्रिया