Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO Balance : पीएफ खात्यात जमा झाले का व्याज? असे तपासा बॅलेन्स

EPFO Balance : अर्थराज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा करण्यात येईल, याची माहिती देण्यात आली आहे.

EPFO Balance : पीएफ खात्यात जमा झाले का व्याज? असे तपासा बॅलेन्स
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 10:55 AM

नवी दिल्ली : देशातील 6.5 कोटी पीएफ खातेदारांसाठी (PF Account Holder) महत्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना केंद्र सरकारने पीएफ व्याजाविषयी आश्वासन दिले आहे. पीएफ व्याज (Interest) जमा करण्याची प्रक्रिया ही निरंतर सुरु असते, असे अर्थराज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात याविषयीची माहिती दिली. कर्मचाऱ्यांना पीएफचे व्याज कधी जमा होणार याची प्रतिक्षा लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून पीएफवरील व्याजदर सातत्याने घसरत असल्याने खातेदार नाराज झाले आहेत. यावेळी व्याजदर कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. व्याजदर अजून घसरला तर पीएफमधील रक्कमेवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

पीएफ खातेदारांच्या खात्यात पीएफ व्याजाची रक्कम जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 98 टक्के अंशधारक संस्था, फर्मचे व्याज 6 मार्च 2023 पर्यंत जमा करण्यात आले आहे. कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. पीएफ व्याज (Interest) जमा करण्याची प्रक्रिया ही निरंतर सुरु असते, असे अर्थराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

2021-22 याकाळातील पीएफ व्याजाची रक्कम खात्यात जमा न झाल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी ही रक्कम लवकरात लवकर जमा करण्यासाठी केंद्राकडे मागणी केली होती. सरकारच्या दाव्यानुसार, 8.1 टक्क्यांनी व्याजाची रक्कम खातेदारांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. पूर्वी हा व्याजदर 8.5 टक्के होता.

हे सुद्धा वाचा

एसएमएस सेवेद्वारे EPFO बॅलन्स कसा तपासायचा?

– EPFO सदस्य, ज्यांचे UAN सेवानिवृत्ती संस्थेकडे नोंदणीकृत आहेत, त्यांना त्यांच्या सर्वात अलीकडील योगदानाचा तपशील आणि भविष्य निर्वाह निधी शिल्लक एसएमएसद्वारे (SMS) मिळवता येईल.

– तुम्हाला फक्त 7738299899 वर “EPFOHO UAN ENG” या मजकुरासह एसएमएस पाठवायचा आहे. इथे तुमच्या प्राधान्याच्या भाषेतील पहिली तीन अक्षरे दर्शविली जातात. ( उदा. ‘ENG’) तुम्हाला एसएमएस तमिळमध्ये मिळवायचा असल्यास ‘TAM’, बंगालीसाठी ‘BEN’, हिंदीसाठी ‘HIN’ वगैरे लिहू शकता. ही सेवा 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे.

– या संदर्भात, तुम्ही तुमचे UAN तुमचे बँक खाते, आधार आणि PAN शी सिंक करायला विसरू नका. कारण EPFO त्याच्या सदस्यांचे तपशील संग्रहित करते. तुम्ही तुमच्या नियोक्त्याला तुमच्यासाठी सीडिंग करण्यास देखील सांगू शकता.

मिस्ड कॉल सेवेद्वारे EPFO बॅलन्स कसा तपासायचा?

– कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO सदस्य 011-22901406 या क्रमांकावर मिस कॉल देऊन पीएफ बॅलन्स तपासू शकता.

– यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरवरून कॉल करावा लागेल.

– तुम्ही UAN पोर्टलवर नोंदणी केली असल्यास तुम्हाला तपशील प्रदान केला जाईल. या संदर्भात तुम्हाला तुमचा UAN लक्षात ठेवण्याची गरज नाही.

सात वर्षांच्या निच्चांकीवर व्याजदर

  1. सीबीटीने व्याजदर ठरवल्यानंतर तो अर्थमंत्रालयाकडे परवानगीसाठी पाठवला जातो.
  2. मार्च 2020 मध्ये ईपीएफओने 2019-20 साठी प्रॉव्हिडंट फंड ठेवींवरील व्याज दर 8.5 टक्क्यांवर आणला.
  3. 2018-19 मध्ये ईपीएफओवर 8.65 टक्के व्याज देण्यात आले होते.
  4. ईपीएफओने 2016-17  आणि 2017-18 मध्ये 8.65 टक्के व्याजही दिले होते.
  5. 2015-16 मध्ये हा व्याजदर 8.8 टक्के होता.
  6. 2013-14 मध्ये खातेदारांना  8.75 टक्के व्याज देण्यात आले होते
  7. 2014-15 मध्ये 8.75 टक्के व्याज देण्यात आले होते.
  8. 2012-13 मध्ये हा व्याजदर 8.5 टक्के होता. 2011-12 मध्ये हे प्रमाण 8.25 टक्के होते.
  9. आर्थिक वर्ष 2020-21 साठी 24 कोटी पीएफ खात्यांमध्ये 8.5 टक्क्यांनी व्याज जमा
  10. त्यानंतर व्याजदरात अजून कपात करत तो 8.1 टक्क्यांवर आला आहे.

खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण.
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला.
काय विचारावं याचं तारतम्य तर ठेवा; शरद पवार चिडले
काय विचारावं याचं तारतम्य तर ठेवा; शरद पवार चिडले.
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.