Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ration Card वरील धान्य झाले कमी? मोदी सरकारचा नवीन नियम जाणून घ्या, 1 नोव्हेंबरपासून लागू झाले धोरण

Ration Card Grain Rule Changed : सरकारने रेशन कार्ड संदर्भात काही नियम बदलले आहे. 1 नोव्हेंबरपासून हे नवीन धोरण लागू झाले आहे. या नियमानुसार तांदळासह गव्हाची खेप कमी झाली आहे का? धान्य वाटप कमी झाले का? काय झाला बदला, जाणून घ्या...

Ration Card वरील धान्य झाले कमी? मोदी सरकारचा नवीन नियम जाणून घ्या, 1 नोव्हेंबरपासून लागू झाले धोरण
रेशन कार्ड
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 3:06 PM

भारत सरकार नागरिकांसाठी अनेक योजना राबवते. या सरकारी योजनांचा लाभ देशातील कोट्यवधी नागरिकांना मिळतो. यातील अत्याधिक योजना या देशातील गरूजूंसाठी आणि गरिबांसाठी आहे. देशातील अनेक लोकांना दोन वेळच्या जेवण्याची भ्रांत आहे. त्यांच्यासाठी स्वस्त धान्य देण्यात येते. स्वस्त धान्य दुकानातून त्यांना साखर, तेल, तांदळासह गव्हाचे वाटप करण्या येते. गोरगरीबांसाठी रेशनिंग पुरवण्यात येते. सरकारने कोरोनो काळात अतिरिक्त धान्य वाटपाला पण मंजूरी दिली होती. आता धान्य वाटपासंदर्भात काही बदल झाले आहेत.

1 नोव्हेंबरपासून नियमात बदल

भारत सरकारने राशन कार्ड संदर्भात नियम बदलले आहेत. 1 नोव्हेंबरपासून नियमात बदल झाला आहे. या नियमातील बदलानुसार रेशन कार्डधारकांना देण्यात येणारा तांदुळ आणि गव्हाच्या वाटपात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हे दोन्ही धान्य समसमान देण्यात येणार आहे. गेल्यावेळी सरकारने राज्यात आनंदाचा शिधा वाटप केला होता. यंदा निवडणूक आचारसंहितेमुळे अनेक निर्बंध आली आहेत.

हे सुद्धा वाचा

तांदळाचे वाटप घटले

केंद्र सरकारने 1 नोव्हेंबरपासून रेशन कार्डधारकांसाठी नियमात बदल केला आहे. तांदळासह गव्हाच्या वाटपासाठी हे नवीन नियम लागू झाले आहेत. पूर्वी सरकार या योजनेनुसार, 3 किलो तांदळासह 2 किलो गव्हाचं वाटप करत होते. आता बदललेल्या नियमानुसार, सरकार तांदळासह गव्हाचं समसमान वाटप करणार आहे.

म्हणजे आता राशन कार्डवर दोन किलो ऐवजी अडीच किलो गव्हाचे आणि 3 किलोऐवजी अडीच किलो तांदळाचे वाटप करण्यात येईल. सरकारने अंत्योदय कार्डवर देण्यात येणाऱ्या 35 किलो खाद्यान्नाच्या वाटपात बदल केला आहे. पूर्वी अंत्योदय कार्डधारकांना 14 किलो गव्हासह 30 किलो तांदळाचे वाटप करण्यात येत होते. तर आता 18 किलो तांदळासह 17 किलो गव्हाचे वाटप करण्यात येणार आहे. हा नियम या 1 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आला आहे.

ई-केवायसीसाठी मुदतवाढ

केंद्र सरकारने यापूर्वीच रेशन कार्डधारकांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. यापूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 1 सप्टेंबर निश्चित झाली होती. पण अनेक अडचणींमुळे कार्डधारकांना ई-केवायसी पूर्ण करता आले नाही. त्यामुळे सरकारने आता एक महिना ही मुदत वाढवली आहे. पण 1 नोव्हेंबर रोजीपर्यंत सुद्धा ई-केवायसी पूर्ण झाले नाही. त्यामुळे केंद्र सरकारने ई-केवायसी करण्याची तारीख आता 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. या काळात ज्यांनी नियम पाळले नाहीत, त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.