तुमच्या पैनकार्डचा गैरवापर करून कर्ज घेतले आहे का? लक्षात येताच अशी करा तक्रार

तुमच्या पॅन कार्डचा कोणी गैरवापर करत आहे का हे तपासण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुमचा सिबिल स्कोअर तपासणे. तुमच्या पॅन कार्डवर अशी कोणतीही कर्जाची माहिती आढळल्यास, जी तुम्ही घेतलेली नाही, तर त्वरित कारवाई करा.

तुमच्या पैनकार्डचा गैरवापर करून कर्ज घेतले आहे का? लक्षात येताच अशी करा तक्रार
पॅन कार्डImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 7:28 PM

मुंबई : पॅनकार्ड संबंधीत फसवणूक (Pan Card Fraud) झाल्याची प्रकरणे अनेकदा समोर येतात. राजकुमार राव, सनी लिओन यांसारख्या अनेक सेलिब्रिटींच्या पॅनकार्डवर कर्ज घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. अशा परिस्थितीत तुमच्या पॅन कार्डचा देखील गैरवापर होऊ शकतो. सायबर फ्रॉडच्या माध्यमातून तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर करून कोणीतरी कर्ज घेऊ शकते. हे कर्ज तुमचा CIBIL स्कोर खराब करू शकते. तसेच, जर तुम्ही कर्जाची परतफेड केली नाही, तर तुम्हाला बँकेकडून थकबाकीदारांच्या यादीत टाकले जाऊ शकते, ज्यामुळे कर्ज आवश्यक असल्यास पुन्हा कर्ज घेणे कठीण होऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे पॅनकार्ड तपासणे खूप गरजेचे आहे.

पॅन कार्डचा गैरवापर कसा ओळखावा

तुमच्या पॅन कार्डचा कोणी गैरवापर करत आहे का हे तपासण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुमचा सिबिल स्कोअर तपासणे. तुमच्या पॅन कार्डवर अशी कोणतीही कर्जाची माहिती आढळल्यास, जी तुम्ही घेतलेली नाही, तर त्वरित कारवाई करा. तुम्ही तुमचा CIBIL स्कोअर कसा तपासू शकता ते येथे आहे.

CIBIL स्कोअर कसा तपासायचा

तुमचा CIBIL स्कोअर तपासण्यासाठी तुम्ही Equifax, Experian, Paytm, BankBazaar किंवा CRIF हाय मार्क सारख्या प्लॅटफॉर्मला भेट देऊ शकता. आता येथे तुम्ही “Check Credit Score” चा पर्याय निवडा. तुम्ही CIBIL स्कोअर मोफत तपासू शकता. त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती द्यावी लागेल,  त्यानंतर घेतलेल्या कर्जांची यादी दिसेल.

हे सुद्धा वाचा

अशा प्रकारे करा तक्रार

पॅनकार्डचा गैरवापर होत असल्यास त्याची अवश्य तक्रार करावी. तुमच्या पॅन कार्डच्या गैरवापराची तक्रार कशी करायची हे तुम्हाला माहित असले पाहिजे. भारत सरकारने एक वेबसाइट विकसित केली आहे. तुम्ही या प्रकारे तक्रार करू शकता.

सर्वप्रथम TIN NSDL च्या अधिकृत पोर्टलला भेट द्या. होम पेजवर ग्राहक सेवेवर जा. आता ड्रॉप डाउन सूचीमधून तक्रार पर्याय निवडा. तक्रारीचा संपूर्ण तपशील एंटर करा आणि कॅप्चा कोड टाकून सबमिट वर क्लिक करा.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.