मुंबई : HDFC Bank ने त्यांच्या ग्राहकांना व्यवहारासंबंधी माहिती देणा-या एसएमएसच्या दराबाबत बदल केला आहे. Insta Alert सेवेतंर्गत ग्राहकांना प्रति एसएमएस अतिरिक्त करांसह 20 पैसे शुल्क मोजावे लागेल. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर याविषयीची माहिती ग्राहकांना देण्यासाठी बँकेने ही सुविधा उपलब्ध केलेली आहे. त्यामुळे ग्राहकाला व्यवहाराचा पडताळा करता येतो तसेच बँकेतील रक्कम आणि वापरलेली सेवा यांची नोंद त्याला वेळेत प्राप्त होते. यापूर्वी या सेवेसाठी बँक ग्राहकाकडून तीन महिन्यांसाठी 3 रुपये आकारत होती. आता प्रत्येक एसएमएससाठी 20 पैसे आणि जीएसटी असे शुल्क द्यावे लागणार आहे. insta alert services साठी हे शुल्क द्यावे लागेल. मात्र यातून ई-मेल (e-mail alert) वगळण्यात आले आहे. ई-मेल अलर्ट सेवा मोफत असेल.
एचडीएफसी बँकेने याविषयीची माहिती वेबसाईटवर दिली आहे. त्यानुसार, यापूर्वी बँकसंबंधी व्यवहारांसाठी तीन महिन्यांना 3 रुपये . insta alert services साठी शुल्क आकारण्यात येत होते. आता त्यात बदल करण्यात आला आहे. आता हे शुल्क जीएसटीसह 20 पैसे असेल. बँक एसएमएस सुविधेसाठीच हे शुल्क आकारत आहे.
एचडीएफसी बँकेचे ग्राहकांना insta alert services मुळे त्यांच्या दैनंदिन बँकिंग व्यवहाराची माहिती मिळते. आर्थिक आणि सर्वसामान्य व्यवहार आणि सूचनांची माहिती एसएमएस प्रणाली आधारे देण्यात येते. खात्यातून रक्कम काढणे, जमा करणे, एटीएममधून मिनी स्टेटमेंट काढणे, बँलेन्स चेक करणे या व अन्य सुविधांची माहिती ग्राहकांना एसएमएसद्वारे देण्यात येते .insta alert services ग्राहकाला एसएमएस आणि ई-मेलद्वारे माहिती देते. insta alert services द्वारे ग्राहकांना बिलाची विलंब तारीख, वेतन जमा झाल्यास, खात्यात कमी बँलेन्स असल्यास यासंबंधीची माहिती देण्यात येते. वास्तविक ही सेवा ऐच्छिक स्वरुपाची आहे, ग्राहकांना गरज नसेल तर ते ही सेवा नाकारु शकतो. जो ग्राहक insta alert services साठी नोंदणीकृत नाही, तरीही संबंधित काही सुविधांची आणि सेवांची माहिती त्याला विनामुल्य पाठविण्यात येईल. त्यासाठी त्याच्याकडून कुठलेही नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र इन्स्टा अलर्ट सेवा नोंदणीकृत ग्राहकांना शुल्क लागेलच. पूर्वी तीन महिन्यांसाठी 3 रुपये आकारण्यात येत होते. आता insta alert services साठी जीएसटी शुल्कासहित 20 पैसे आकारण्यात येणार आहेत.
insta alert services सुविधेतून बाहेर पडा
ग्राहकाला insta alert services नको असेल आणि यापूर्वी त्याने या सेवेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली असेल तर अशा ग्राहकांना खालील प्रक्रिया करुन या सुविधेतून बाहेर पडता येईल.
ग्राहकाने बँकेच्या ऑनलाईन खाते कस्टमर आयडी आणि पासवर्ड वापरुन उघडावे
यामध्ये उजव्या बाजुला insta alert services असे दिसेल. त्यावर क्लिक करा
याठिकाणी डि-रजिस्टरचा पर्याय उपलब्ध आहे.
अलर्ट टाईप निवडा आणि कन्फर्म करा
insta alert services सेवेच्या लाभधारक यादीतून ग्राहकाचे नाव हटविण्यात येईल
इकोनॉमिक टाईम्सनुसार, बँकेकडून एसएमएस सुविधेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर ग्राहकाने त्यांचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी व्यवस्थितरित्या बँकेकडे नोंदणी केली आहे की नाही, याची खात्री करुन घ्यावी. आता बँकेचे ऑनलाईन खाते वापरताना, एटीएममधून दहा हजारांच्या वर रक्कम काढताना ओटीपी हा एसएमएसद्वारे पाठविण्यात येतो. सुरक्षेसाठी ही सेवा फायद्याची ठरते. ग्राहकांना त्यांच्या खात्याशीसंबंधित हालचाली तात्काळ एसएमएसद्वारे माहिती पडतात. मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी रजिस्टर नसेल तर तात्काळ तो बँकेच्या insta alert services मध्ये नोंद करा.
इतर बातम्या :
बारकोड कसे काम करते? प्रत्येक कोडमध्ये दिसणाऱ्या उभ्या काळया लाईन कशा रीड केल्या जातात