गृहकर्ज अवघ्या 2 मिनिटांत, तेही व्हॉट्सअपवर! HDFC ची झटपट कर्ज योजना खासच आहे!

HDFC बँके ग्राहकांना अवघ्या दोन मिनिटांत गृहकर्ज मंजूर करणार आहे आणि तेही तुमच्या व्हॉट्सअपवर, आहे की नाही झटपट कर्ज योजना. काही आवश्यक माहिती शेअर करुन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता

गृहकर्ज अवघ्या 2 मिनिटांत, तेही व्हॉट्सअपवर! HDFC ची झटपट कर्ज योजना खासच आहे!
Money INRImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 9:23 AM

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने (HDFC) मंगळवारी ग्राहकांसाठी (Consumer) झटपट गृहकर्ज (Home Loans)योजना आणली आहे. विशेष म्हणजे या कर्जासाठी तुम्हाला बँकेच्या पाय-या झिजवायच्या नाहीत. तर तुमचे सोशल मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही हे कर्ज अवघ्या दोन मिनिटात प्राप्त करु शकतात. अर्थात बँकेच्या पात्रता यादीत तुम्ही उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. झटपट कर्ज, द्या कागदपत्र पटपट असा काहीसा हा मामला आहे. तुम्ही केवळ कागदपत्रांसाठी खटपट करायची आहे. त्यानंतर एचडीएफसी बँक तात्काळ गृहकर्ज मंजूर करेल. बँकेने त्याला स्पॉट ऑफर असे नाव दिले आहे. त्यामुळे कर्जदाराला अवघ्या दोन मिनिटांत कर्ज मंजुरीचा संदेश व्हॉट्सअप या सोशल मीडियावर प्राप्त होईल. आता बँक दारी नाहीतर थेट मोबाईलमधून तुम्हाला कर्ज देण्यासाठी तयार आहे, तुम्हालाही या गृहकर्ज योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रक्रियेच्या या काही पाय-या पूर्ण करुन तुम्ही सहज गृहकर्ज मिळवू शकता.

चला तर ही प्रक्रिया समजून घेऊयात. सर्वात अगोदर ग्राहकाला गृहकर्ज घेण्यासाठी + 91 98670 00000 या क्रमांकावर व्हॉट्सअप मॅसेज करावा लागेल आणि काही आवश्यक माहिती द्यावी लागेल. ग्राहकाने दिलेल्या माहितीची छाननी केल्यानंतर ग्राहक कर्ज योजनेसाठी पात्र आहे की नाही याची खात्री करण्यात येईल.

पडताळणीनंतर पात्र ग्राहकाला तात्काळ तात्पुरते गृहकर्ज मंजुरीचे पत्र व्हॉट्सअपवर देण्यात येईल. आता एक अट मात्र नक्की आहे, ती म्हणजे ही ऑफर केवळ वेतनधारी ग्राहकांसाठी आहे. पगारदार व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल. तर वाट कसली बघता, चला दोन मिनिटांत गृहकर्जाची पूर्ण प्रक्रिया पाहुयात…

  1. सर्वात अगोदर + 91 98670 00000 या व्हॉट्सअप क्रमांकावर Hi लिहून पाठवा. लागलीच तुमच्या गृहकर्जाची प्रक्रियेला सुरुवात होईल
  2. प्रक्रिया सुरु होताच मेन्यू मधून नवीन कर्ज हा पर्याय निवडा
  3. त्यानंतर नवीन कर्ज ऑफर हा पर्याय निवडा
  4. उत्पन्न गटातून पगारदार अथवा सेल्फ एंप्लाईडचा पर्याय निवडा
  5. स्थानिक पत्त्यात भारतीय अथवा परदेशी नागरिकांचा पर्याय निवडा
  6. तुमच्या शहराचा टपाल खात्याचा पिनकोड टाका
  7. पॅनकार्डवरील माहितीनुसार, तुमचे संपूर्ण नाव लिहा
  8. अटी व शर्ती स्वीकारा. त्यानंतर तुम्ही प्रविष्ट केलेली संपूर्ण माहिती समोर येईल. ती वाचून, पडताळा करुन ती स्वीकारा आणि खात्री द्या.
  9. ओटीपी प्राप्त होईल, तो व्हाट्सअपवरील प्रक्रियेत प्रविष्ट करा
  10. दरमहा एकूण वेतन किती प्राप्त याची माहिती द्या
  11. सध्या एकाद्या कर्जाचा ईएमआय भरत असाल तर त्याची माहिती प्रविष्ट करा
  12. ही सर्व माहिती भरताच, तुम्हाला तात्काळ तात्पुरते गृहकर्ज मंजुरीचे पत्र पीडिएफ स्वरुपात शेअर करण्यात येईल
  13. आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँक तुमच्याशी संपर्क साधेल आणि
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.