Health Insurance : आरोग्य विमा ही महागला! प्रीमियममध्ये झाली इतकी वाढ

Health Insurance : आरोग्य विम्यासाठी ग्राहकांना आता अधिक पैसा मोजावा लागेल. त्यांना विम्यासाठी अधिकचा हप्ता द्यावा लागेल. आरोग्य विमा खरेदीसाठी ही आता अधिक पैसा लागणार आहे.

Health Insurance : आरोग्य विमा ही महागला! प्रीमियममध्ये झाली इतकी वाढ
विमा महागला
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 4:30 PM

नवी दिल्ली : कोरोना काळानंतर (Corona) भारतात आरोग्य विम्याचे प्रचलन वाढले. आरोग्य विम्याकडे दुर्लक्ष करणारे भारतीय, अचानक जागरुक झाले. त्यामुळे आरोग्य विमा क्षेत्रात (Health Insurance Sector) पॉलिसी खरेदीचे सर्व रेकॉर्ड तुटले. त्याचा फटकाही विमा कंपन्यांना बसला. या काळात त्यांना अधिकची नुकसान भरपाई मोजावी लागली. आरोग्य विमा स्वस्त असल्याने ग्राहकांच्या उड्या पडल्या होत्या. या नवीन वर्षात विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) कंपन्यांना विमा पॉलिसीचा हप्ता वाढविण्यासाठी हिरवा कंदिल दाखविला. त्यानंतर आता आरोग्य विमा पॉलिसी नुतनीकरण आणि नवीन पॉलिसी खरेदीसाठी ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. त्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे.

किती वाढला विमा आरोग्य विम्यात आता महागाईची लाट आली आहे. वर्ष 2021 पेक्षा यंदा 2023 मध्ये ग्राहकांना आरोग्य विमा खरेदीसाठी अधिक रक्कम द्यावी लागेल. दोन वर्षात प्रीमियममध्ये जवळपास 14 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. नुतनीकरण आणि नवीन पॉलिसी खरेदीसाठी ग्राहकांच्या खिशावर ताण पडेल. महागाई दर सातत्याने वाढत आहे. 2021 वैद्यकीय महागाई दर 14 टक्के होता, आशियाई देशांमध्ये हा खर्च सर्वाधिक आहे. त्यात या दोन वर्षांत आणखी भर पडली आहे. त्यामुळे आरोग्य विम्यावर त्याचा परिणाम दिसून येत आहे.

ग्राहकांकडे काय पर्याय आरोग्य विमा पॉलिसीच्या हप्त्यात आता वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना नवीन पर्यांयाचा अथवा नुतनीकरताना इतर पर्यायांबाबत जागरुक रहावे लागेल. जर तुम्ही वेळेच्या आधीच विमा पॉलिसीचे नुतनीकरण केले तर तुम्हाला या वाढीव हप्त्याची झळ बसणार नाही. त्यासाठी विमा प्रतिनिधी आणि विमा कंपनीशी बोलून, प्रीमियम कोणत्या तारखेपासून वाढविण्यात येईल, याची माहिती घ्या.

हे सुद्धा वाचा

नुतनीकरणासाठी नका पाहू वाट अनेक ग्राहक, विमा पॉलिसी शेवटच्या तारखेला अपडेट, अद्ययावत करतात. त्यांना हा आळस नडतो. अनेक कंपन्या त्यांच्या विमा पॉलिसीचा हप्ता लवकरच वाढविणार आहे. त्यांनी काही ग्राहकांना सवलत देण्याची शक्यता असते. पण त्यासाठी नुतनीकरणाला विलंब लावता कामा नाही. तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहिली तर पॉलिसी व्यपगत, लॅप्स होण्याची शक्यता असते. अथवा विलंब शुल्कासह दंड ही लागतो. वाढलेला विमा हप्ता पण द्यावा लागतो.

तर पॉलिसी करा पोर्ट सध्याच्या विमा कंपनीच्या सेवा आणि सुविधेबाबत तुम्ही असमाधानी असाल तर मग तुमच्याकडे इतर पर्याय आहेत. अथवा इतर विमा कंपनी चांगली सेवा आणि सवलत देत असले तर तुम्ही विमा कंपनी बदलवू शकता. तुम्ही पॉलिसी पोर्ट करु शकता. तुमच्याकडून अधिकची रक्कम उकळण्यात येत असेल तर स्वस्त प्रीमियम, ऑफर यासह इतर प्रकारच्या सेवांचा पर्याय तुम्हाला निवडता येतो. चांगला पर्याय मिळाल्यास, ग्राहक विमा कंपनीत बदल करु शकतो.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.