Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax Helpline : ITR फाईलिंग करताना अडचण? या क्रमांकावर करा कॉल

Income Tax Helpline : 27 जुलैपर्यंत आतापर्यंत 5.3 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसांत हा आकडा अजून वाढेल. करदात्यांच्या मदतीसाठी आयकर खात्याने हेल्पलाईन क्रमांक, ईमेल्स जाहीर केले आहे.

Income Tax Helpline : ITR फाईलिंग करताना अडचण? या क्रमांकावर करा कॉल
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 7:10 PM

नवी दिल्ली | 29 जुलै 2023 : आर्थिक वर्ष 2022-23 साठी इनकम टॅक्स रिटर्न दाखल (Income Tax Return) करण्याची अंतिम तारीख आता एकदम जवळ आली आहे. केवळ दोन दिवस आयटीआर भरण्यासाठी उरले आहेत. आयकर विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत 5.3 कोटींहून अधिक करदात्यांनी इनकम टॅक्स रिटर्न दाखल केला आहे. येत्या दोन दिवसांत त्यांना आयटीआर दाखल करण्याची घाई करावी लागेल. 31 जुलै ही अंतिम मुदत (ITR Filing Deadline) आहे. वेळेच्या आत आयटीआर दाखल केला नाही तर दंड बसू शकतो. करदात्यांच्या मदतीसाठी आयकर खात्याने हेल्पलाईन क्रमांक, ईमेल्स जाहीर केले आहे.

ऑनलाईन कसे करावे ITR फाईल

आयकर खात्याने करदात्यांना ऑनलाईन इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी, ई-फाईलिंगसाठी एक स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. त्यासाठी https://www.incometax.gov.in/iec / foportal वर लॉग इन करावे लागेल. तुम्हाला ऑनलाइन आईटीआर फाईल करु शकता.

हे सुद्धा वाचा

ही चूक करु नका

ITR फायलिंग वेळी करदाते अनेकवेळा छोट्या-मोठ्या चुका करतात. त्यामुळे अनेकदा रिफंड मिळण्यास उशीर होतो. पहिल्यांदा इनकम टॅक्स रिटर्न फाईल करणार असाल तर तुम्ही या चुका करु नका. ई-फायलिंग पोर्टलवर ITR भरताना चुका टाळणे आवश्यक आहे. योग्य माहिती आणि तपशील देणे आवश्यक आहे.

अडचणीसाठी हेल्पलाईन

आयकर विभागाने ट्विट आणि ई-मेलच्या माध्यमातून करदात्यांसाठी हेल्पलाईन क्रमांकाची माहिती दिली. करदात्यांना समस्या अडचण असेल तर ते या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार करु शकतात. आयकर विभाग 24 तासांत हेल्पलाईन क्रमांक, चॅटबॉट अथवा ईमेल्सच्या सहायाने या अडचणी सोडवणार आहे.

शनिवार-रविवारी सुद्धा सुविधा

आयकर विभागाने याविषयीचे अधिकृत ट्विट केले आहे. त्यानुसार, आयटीआर दाखल करण्यासाठी, कराचा भरणा करण्यासाठी, इतर सेवांसाठी करदात्यांना मदत करण्यात येत आहे. त्यासाठी हेल्पडेस्क सुरु करण्यात आला आहे. 24×7 आधारे करदात्यांना मदत करण्यात येईल. कॉल, लाईव्ह चॅट, वेबेक्स सत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत करण्यात येईल. शनिवार-रविवारी सुद्धा अंतिम मुदतीपर्यंत ही सुविधा सुरु राहणार आहे.  आयकर विभागाने करदात्यांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत.

करदात्यांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक

1800 103 0025 1800 419 0025 +91-80-46122000 +91-80-61464700

या ई-मेलवर करा तक्रार

करदात्यांना पॅन आणि मोबाईल क्रमांकाच्या आधारे orm@cpc.incometax.gov.in वर तक्रार दाखल करता येईल.

याठिकाणी करा संपर्क

एआयएस, टीआयएस, एसएफटीसाठी सुरुवातीला प्रतिक्रिया, ई-अभियान वा ई-पडताळणी विषयीची अडचण, समस्येसाठी 1800 103 4215 या क्रमांकावर कॉल करता येईल.

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.