लग्नाला न लागो दृष्ट; करा विम्याचं औक्षण! विवाह विम्यामुळे नुकसानीपासून व्हा तणावमुक्त!

लग्न विम्याला (Wedding Insurance) सुगीचे दिवस आले आहेत. लग्नसराई दरम्यान काही कारणाने कार्यक्रम पुढे ढकलण्यावर होणारा खर्च किंवा दागिने चोरी झाल्यास विवाह विम्यातून नुकसान भरपाई मिळते. यात जेवढा जास्त तुम्ही विमा घ्यायला तेवढा त्यावरील प्रिमियम (Primium) तुम्हाला भरावा लागेल.

लग्नाला न लागो दृष्ट; करा विम्याचं औक्षण! विवाह विम्यामुळे नुकसानीपासून व्हा तणावमुक्त!
लग्न विमा (प्रातिनिधित छायाचित्र)Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 12:03 PM

Wedding Insurance : हल्ली लग्न विम्याला (Wedding Insurance) सुगीचे दिवस आले आहेत. हा नवीन ट्रेंड सध्या चांगलाच चलनात आला आहे. अचानक लग्न मोडणे, मौल्यवान वस्तूंची चोरी, वैयक्तिक अपघात आणि नैसर्गिक आपत्तीतून होणारे नुकसान भरून काढण्यासाठी हा एक चांगला, पर्याय ठरत आहे. आयुष्यात लग्न ही एक अशी घटना आहे जिच्या खर्चाला मर्यादा नसते. या मंगलमय कार्यात प्रत्येकजण आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. अनेक कुटुंबांमध्ये लग्नासाठी एक-दोन वर्ष आधीच खरेदी सुरू होते. आजकाल लोक हॉटेल्स, केटरिंग (Cattering) आणि ब्युटिशियन्सचं बुकिंग खूप आधीपासून करायला सुरुवात करतात. प्रीवेडिंग फोटो शूट हा आणखी एक प्रचलनात आलेला प्रकार दोन कुटुंबांना एकत्र आणतो. त्यामुळे या आनंदाला गालबोट लागू नये यासाठी विमा संरक्षण घेण्याचा कल वाढला आहे. जेवढा जास्त तुम्ही विमा घ्यायला तेवढा त्यावरील प्रिमियम (Primium) तुम्हाला भरावा लागेल.

वेडिंग इन्शुरन्स म्हणजे काय?

Metromony.com‘च्या अहवालानुसार देशात दरवर्षी 1.1 ते 1.3 कोटी विवाह होतात. कन्सल्टन्सी कंपनी केपीएमजीच्या अहवालानुसार देशात लग्नसमारंभांचा व्यवसाय 3.71 लाख कोटी रुपयांचा असून, तो वार्षिक 25 ते 30 टक्के दराने वाढत आहे. लग्नाच्या तयारीदरम्यान चोरी, दरोडा, आग किंवा खोडसाळपणा अशी अप्रिय घटना घडली तर कुटुंबासमोर संकटांचा डोंगर उभा राहतो.

ट्रेंड अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात

अशा नुकसानीची भरपाई करण्यासाठी वेडिंग इन्शुरन्स हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. मात्र, भारतात लग्नासाठी विम्याचा ट्रेंड अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात असल्याचे फायनान्शिअल प्लॅनर जितेंद्र सोलंकी सांगतात. युरोप- अमेरिकेसारख्या विकसित देशांत ही परंपरा अतिशय समृद्ध झाली आहे. महागाईच्या दृष्टीने हा अगदी स्वस्त पर्याय आहे. या माध्यमातून लग्न समारंभादरम्यान कोणत्याही अपघाती घटनेमुळे होणाऱ्या नुकसानीपासून स्वत:चा बचाव करता येतो

विमा संरक्षण

आता लग्नाच्या विम्यात जोखमीची व्याप्ती लक्षणीय वाढली आहे. कोणत्याही कायदेशीर किंवा विशेष कारणामुळे लग्न मोडण्यापासून ते कोणत्याही गुन्हेगारी घटनांमुळे विवाहस्थळाचे होणारे नुकसान विमा संरक्षणात समाविष्ट केले जाते. लग्नात दागिने, कपडे किंवा इतर कोणत्याही मौल्यवान वस्तू चोरीला गेल्यास त्याची भरपाई विमा कंपनी करेल. पाऊस, वादळ किंवा भूकंपामुळे लग्नाचा कार्यक्रम रद्द झाला असेल तर त्याची भरपाई विमा कंपनी करेल. आता विमा कंपन्या लग्नाच्या विम्यात वैयक्तिक अपघातांचाही समावेश करत आहेत. या पॉलिसीमध्ये समाविष्ट असलेल्या अनेक लोकांना दुखापत झाल्यास, अपंगत्व आल्यास ल्यास आणि अपघातात मृत्यू झाल्यास विमा कंपनी नुकसान भरपाई देईल.

विम्यासाठी ‘या’ गोष्टी महत्त्वाच्या –

– लग्नासाठीच्या खर्चाचा आरखडा विमा कंपनीला द्यावा लागेल – लग्नस्थळाची माहिती, बुकिंग पावत्या विमा प्रतिनिधीला द्याव्या लागतील – क्लेमसाठी अगोदरच सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज भरून द्यावा – विवाह सोहळ्यात चोरीची घटना घडल्यास पोलिसांकडे रितसर तक्रार नोंदवा – एफआयआरची प्रत विमा कंपनीला सादर करा – लग्नाचा बेत रद्द झाल्यास विमा प्रतिनिधी भेट देऊन यासंबंधीचा पडताळा करेल – त्यानंतर विमा दावा मंजूर, नामंजूर करेल. – विमा दावा नामंजूर केल्यास तुम्हाला संबंधित न्यायालयात दाद मागता येईल. – अशा परिस्थितीत नाही मिळणार विमा – दहशतवादी हल्ला झाल्यास – अचानक संप पुकारल्यास – नवरा अथवा नवरीचे अपहरण – लग्नप्रसंगी दोन्ही पक्षांपैकी एखादा हजर न राहिल्यास – लग्नाचे कपडे अथवा खासगी वस्तुंचे नुकसान – इलेक्ट्रिकल अथवा मॅकनिकल नादुरुस्ती – लग्नप्रसंगी दोन्ही पक्षांपैकी एखाद्याने आत्महत्या केल्यास

किती येईल खर्च?

सध्या देशात आयसीआयसीआय लोम्बार्ड, फ्युचर जनराली, एचडीएफसी आर्गो, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स या कंपन्या वेडिंग इन्शुरन्सची सुविधा देत आहेत. या विम्याच्या बदल्यात कंपन्यांना सध्या फार कमी क्लेम द्यावे लागतात. त्याचा प्रीमियम अगदी स्वस्त आहे. वेडिंग इन्शुरन्स कव्हरसाठी साधारण 1 ते 1.5 टक्के खर्च येईल. 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण घेतल्यास त्यासाठी सुमारे 15 हजार रुपये मोजावे लागतील. महागाई पाहता या रकमेत सवलत मिळण्याचा प्रश्नच येत नाही.

आणखी वाचा :

Car Insurance | वाहन विमा घेताय? या गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष; चांगल्या डीलसाठी रहा आग्रही

अधिक परतावा, अधिक कमाई, इक्विटी फंडात नफ्याची मलाई; ‘या’ योजनेत गुंतवणूकदारांना मोठा फायदा

Gold Price Today : चांदी 68 हजारच्या पार, तर सोनंही महागलं! जाणून घ्या आजचा दर

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.