FD वर ‘या’ बँका देताय वर्षभरासाठी सर्वाधिक व्याजदर, लगेच गुंतवणूक करा

| Updated on: Jan 03, 2025 | 3:00 PM

तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आज आम्ही तुम्हाला एक खास पर्याय सांगणार आहोत. प्रत्येक बँकेच्या FD चे व्याजदर वेगवेगळे असतात. अशावेळी ज्या बँकेचे व्याजदर इतर बँकांपेक्षा जास्त आहेत, अशा बँकेत FD मध्ये गुंतवणूक करावी. आज आम्ही तुम्हाला अशा बँकांच्या FD च्या व्याजदराबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला 1 वर्षाच्या कालावधीच्या FD मध्ये सर्वाधिक व्याज मिळेल. जाणून घेऊया.

FD वर ‘या’ बँका देताय वर्षभरासाठी सर्वाधिक व्याजदर, लगेच गुंतवणूक करा
मुदत ठेव
Follow us on

तुम्हाला गुंतवणूक करायची का? तर मग तुमच्यासाठी FD हा खास पर्याय असू शकतो. कारण प्रत्येक बँकेच्या FD चे व्याजदर वेगवेगळे असतात. अशावेळी ज्या बँकेचे व्याजदर इतर बँकांपेक्षा जास्त आहेत, अशा बँकेत FD मध्ये गुंतवणूक करावी. याचविषयी आज सविस्तर जाणून घेऊया.

गुंतवलेल्या ठिकाणावरुन खात्रीशीर परतावा यावा, ही अगदी सर्वांचीच इच्छा असते. यासाठी FD हा पर्याय चांगला असू शकतो. बहुतांश लोक फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FD ला उत्तम पर्याय मानतात. FD मध्ये मिळणारा परतावा निश्चित असतो. त्याचबरोबर पैसे गमावण्याची भीतीही नसते. FD मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला तुमच्या पैशांवर वेळेनुसार व्याज मिळते. प्रत्येक बँकेच्या FD चे व्याजदर वेगवेगळे असतात. अशावेळी ज्या बँकेचे व्याजदर इतर बँकांपेक्षा जास्त आहेत, अशा बँकेत FD मध्ये गुंतवणूक करावी.  या बँकांच्या FD वर तुम्हाला 1 वर्षाच्या कालावधीच्या FD मध्ये सर्वाधिक व्याज मिळेल.

बंधन बँक

हे सुद्धा वाचा

बंधन बँकेत तुम्हाला 1 वर्षाच्या कालावधीच्या FD वर 8.05 टक्के व्याज मिळेल.

इंडसइंड बँक

इंडसइंड बँकेवर 1 वर्षाच्या कालावधीसाठी FD वर 7.75 टक्के व्याज दर आहे.

आरबीएल बँक

तुम्ही आरबीएल बँकेत 1 वर्षाच्या FD मध्ये आपले पैसे गुंतवले तर तुम्हाला 7.5 टक्के व्याजदरानुसार परतावा मिळेल.

कर्नाटक बँक

बँक 1 वर्षाच्या मुदतीच्या FD वर 7.25 टक्के व्याज देते.

येस बँक

येस बँकेत तुम्हाला 1 वर्षाच्या FD वर 7.25 टक्के व्याज दर मिळेल.

कोटक महिंद्रा बँक

कोटक महिंद्रा बँक 1 वर्षाच्या मुदतीच्या FD मध्ये पैसे गुंतवल्यास 7.1 टक्के व्याज देते.

प्रत्येक बँकेच्या FD चे व्याजदर वेगवेगळे असतात. अशावेळी ज्या बँकेचे व्याजदर इतर बँकांपेक्षा जास्त आहेत, अशा बँकेत FD मध्ये गुंतवणूक करावी. तुम्ही आताच गुंतवणूक केल्यास ती तुम्हाला भविष्यात उपयोगात येऊ शकते किंवा फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे छोटी का होईना, पण गुंतवणूक गरजेची आहे. तुम्ही वेगवेगळ्या योजनांमध्ये देखील पैसे गुंतवू शकतात. ज्या योजना 100 टक्के हमी देतात, अशा योजना तुम्हाला फायदेशीर ठऱू शकतात. फक्त काहीही गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा एकदा सल्ला घ्यावा. कारण, हे पूर्ण पैशांचं गणित आहे. आपलं आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी तज्ज्ञांचा सल्ला गरजेचा आहे.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)