Return : परताव्याची हमी, योजनाही सरकारी, अबाल वृद्धांपासून सर्वांसाठी ही गुंतवणूक भारी
Return : या सरकारी योजनांमध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला चांगला परतावा मिळवून देऊ शकते.
नवी दिल्ली : प्रत्येक जण जास्तीचा मोबदला मिळविण्यासाठी गुंतवणूक (Investment) करतो. बऱ्याचदा योग्य माहिती न मिळाल्याने गुंतवणूकदार (Investor) चांगल्या योजनांपासून आणि त्यांच्या फायदापासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांनी बाजारावर आणि त्यासंबंधीच्या घडामोडींवर लक्ष्य ठेवणे आवश्यक आहे.
शेअर बाजारातच गुंतवणूक करावी असे काही नाही. काही जण म्युच्युअल फंडाचाही गुंतवणुकीसाठी वापर करतात. तर काही सरकारी योजनाही तुमच्या मदतीला येऊ शकतात. यामधील गुंतवणूक तुम्हाला चांगला परतावा तर देतेच पण रक्कम डुबण्याची भीती ही नसते.
सरकारी योजना या जोखीम मुक्त असतात. यातील गुंतवणूक धोक्याबाहेरील असते. तसेच सरकारी योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर कर सवलतही मिळते. त्यामुळे ग्राहकाला परताव्यासोबतच इतर सुविधाही प्राप्त होतात.
सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणे हे मुलींच्या भविष्यासाठी सर्वात चांगली योजना आहे. या योजनेतंर्गत गुंतवणूकदारांना प्राप्तीकर कायदा 80सी अंतर्गत कर सवलत मिळते. या योजनेत गुंतवणूकदार केवळ 250 रुपयांत खाते उघडू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणुकीवर 7.6 टक्के आकर्षक व्याज मिळते. योजनेत मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आई-वडिलांना खात्यातून 50 टक्के रक्कम काढता येते. त्यासाठी कोणताही दंड आकारण्यात येत नाही.
पगारदार व्यक्तींना आर्थिक सुरक्षेसाटी पीपीएफ हा सर्वात चांगला पर्याय आहे. पब्लिक प्रोव्हिडंज फंडच्या सहाय्याने गुंतवणूकदाराला कर सवलतीसह परताव्याची हमी मिळते. योजनेतंर्गत एका वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते.
व्याज आणि मॅच्युरिटीवर ही टॅक्स बचत होते. पीपीएफवर गुंतवणूकदारांना कर्ज मिळण्याची सुविधा ही प्राप्त होते. सध्या पीपीएफवर सरकार 7.1 टक्क्यांचा व्याज दर लागू आहे.
तर ज्येष्ठांसाठी सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम फायदेशी आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षांपर्यंत रक्कम जमा करता येते. SCSS योजनेत गुंतवणुकीवर 7.4% टक्क्यांचा परतावा मिळतो. या योजनेत 1000 रुपयांपासून ते 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. गुंतवणूक ही कर मुक्त असते.