Home Insurance : घराला हवे विम्याचे कवच; नुकसान झाल्यास मिळेल भरपाई
इमारत कोसळून झालेल्या नुकसानीची भरपाई कशी करता येईल, असा प्रश्न अनेकांना सतावतो . नुकसानीच्या भरपाईसाठी कोणता विमा उपलब्ध आहे आणि त्याचे नियम काय आहेत. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबई : देशात गेल्या काही वर्षांत कमकुवत बांधकाम आणि दर्जेदार नसलेल्या साहित्याच्या वापरामुळे इमारती कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत इमारत कोसळून झालेल्या नुकसानीची भरपाई कशी करता येईल, असा प्रश्न अनेकांना सतावत असतो. यावर कोणता विमा (Home Insurance) आहे? आणि त्याचे नियम काय आहेत अशी प्रश्नांची जंत्री उभी राहते. तसेच काहींना विमा पॉलिसी (Insurance policy) हा एक व्यर्थ खर्च असल्याचा साक्षात्कार वाटतो. विम्यावर वायफळ खर्च करू नये अशीच काहींची धारणा असते. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित (Natural disasters) कारणांमुळे तुमच्या घराचं काही नुकसान झालं तर तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे गृहविमा निवडणं आणि भविष्यात कोणतंही मोठं आर्थिक नुकसान टाळता येते. संकटात विम्यात केलेली गुंतवणूक कामी येते. विमा पॉलिसीचे फायदे नुकसान भरपाई मिळाली की कळतात. तर गृह विम्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
गृहविमा का महत्त्वाचा?
तुमचं घर आणि त्यातलं सामान तुमच्यासाठी खूप मौल्यवान आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणांमुळे तुमच्या घराचं काही नुकसान झालं तर तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. भूकंप, पूर आदी नैसर्गिक आपत्ती सांगून येत नाहीत. त्यामुळे गृहविमा निवडणं आणि भविष्यात कोणतंही मोठं आर्थिक नुकसान टाळलं तर तुमचाच फायदा होईल. सर्वसाधारणपणे, होम इन्शुरन्स पॉलिसीचे दोन भाग असतात, एक आपल्या घरातील वस्तूंवर संरक्षण प्रदान करते आणि दुसरे इमारतीला संरक्षण देते. आपल्या गरजेनुसार आपण यापैकी एक संरक्षण घेऊ शकता अथवा आपण दोन्ही सेवांचे संरक्षण घेऊ शकता , ज्यांना सर्वसमावेशक कव्हर्स म्हणतात.
गृहविमा महाग नाही
समजा, तुमच्याकडे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह होम इन्शुरन्स पॉलिसी आहे, ज्याची रक्कम 40 लाख रुपयांपर्यंत संरक्षण मिळते आणि तिचा वार्षिक प्रीमियम 5000 रुपये आहे. या अत्यंत कमी प्रीमियम दरामुळे गृहविमा पॉलिसी महाग आहे, असे म्हणता येणार नाही.
हे लक्षात ठेवा
आपल्या घरासाठी योग्य विम्याचा दावा करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. बांधकामातील दोषामुळे इमारत कोसळली असेल, तर अशावेळी दाव्यासाठी अर्ज करताना त्या व्यक्तीने काळजी घेणे आवश्यक आहे. त्याने विमा योजनेतील अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचायला हव्यात. इमारत कोसळण्याची व्याख्या काय आहे आणि काही भाग पडल्यावर विमा संरक्षण मिळते का हे तपासून पाहिले पाहिजे. त्यासाठी आपल्या पॉलिसीची प्रमाणित प्रत मागवून ती पूर्ण वाचा.
इतर बातम्या :