Home Insurance : भूंकप असो वा महापूर, नका घेऊ Tension, करा केवळ हे काम

Home Insurance : आजच्या काळात गृह विमा अत्यंत महत्वाचा आहे. वातावरणातील बदलामुळे नैसर्गिक आपत्ती येऊन धडकत आहेत. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी विम्याचा असा फायदा होतो.

Home Insurance : भूंकप असो वा महापूर, नका घेऊ Tension, करा केवळ हे काम
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 7:24 PM

नवी दिल्ली | 14 सप्टेंबर 2023 : भारताने गेल्या दोन महिन्यात निसर्गाचे रौद्ररुप पाहिले आहे. हिमाचल प्रदेशातील महापूर, भूस्खलन या नैसर्गिक आपत्तीने मोठे नुकसान झाले. गुजरात, राजस्थानसह देशातील इतर भागांना महापूराचा फटका बसला आहे. अनेक लोकांना या नैसर्गिक आपत्तीमुळे घर सोडावे लागेल. त्यांची घरे सुद्धा वाहून गेली. त्यांनी जवळच्या व्यक्तींना गमावले. देशातील या आपत्तीमुळे अनेक ठिकाणी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. आसाममध्ये आलेल्या पुराने 10 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले. अशावेळी गृहविमा (Home Insurance) कामी येतो. या योजनेत भूंकप, महापूर आणि नैसर्गित आपत्तीत (Natural Disasters) घराचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळते. हा विमा नुकसान भरुन काढू शकतो. अर्थात तुमचे घर तर परत येणे अशक्य असते, पण झालेले नुकसान भरुन काढता येते.

काय काय होते कव्हर

गृह विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळते. वादळ, गारपीट, आग, वीज, महापूर, भूकंप या नैसर्गिक आपत्तीत भरपाई मिळते. घराचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई या विम्यातून मिळते. हा विमा नुकसान भरून काढू शकतो काही प्रकरणात Act of God च्या अंतर्गत संरक्षण मिळत नाही. त्यातही नुकसान भरपाईचा दावा करता येत नाही. काही कंपन्या सवलत देतात. त्याचा विमाधारकांना मोठा फायदा होतो.

हे सुद्धा वाचा

काय आहे हा विमा

होम इन्शुरन्स ही एक विमा पॉलिसी आहे. या योजनेत घर, तुमची संपत्ती, सामानाचे नुकसान यांची भरपाई मिळते. ही विमा योजना इतर विमा योजनांसारखीच एक योजना आहे. गृह विमा हा घराच्या मालकाचा विमा म्हणून ओळखल्या जातो. बंगला, अपार्टमेंट, भाड्याचा फ्लॅट यांना विम्याचे संरक्षण मिळते. कोणत्याही प्रकारची दुर्घटना, नैसर्गिक आपत्तीत घराचे नुकसान झाल्यास आर्थिक भरपाई मिळते.

करा विम्यासाठी दावा

दंगल, चोरी, तोडफोड, मालमत्तेची नासधूस हे पण गृहविम्यात येतात. रेल्वे किंवा रस्त्याच्या बांधकामामुळे नुकसान झाले असेल. विमानाची किंवा कोणत्याही वाहनामुळे, स्फोटामुळे, आगीमुळे घराचे नुकसान झाले असेल तर गृह विम्याता दावा करता येतो. गृह विमा योजना घरातील सामान, वस्तूंसाठी पण उपयोगी ठरते.

स्वस्तात विमा खरेदीची संधी

लवकर केंद्र सरकार एजंटचे कमिशन निश्चित करणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) कमिशनवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विमा स्वस्त झाला तर सर्वसामान्य व्यक्तीलाही विमा संरक्षण मिळेल. तोही स्वस्तात विमा खरेदी करु शकेल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.