Home Loan : विशित घर खरेदीचा ट्रेंड, कर्ज घेण्याच्या प्रमाणात वाढ, वाचा प्रमुख कारणे
दहा वर्षापूर्वी गृह कर्ज घेणाऱ्यांच्या वय सरासरी चाळीशीच्या घरात असायचं. पाच वर्षापूर्वी वयाचं प्रमाण 32-33 मध्ये पोहोचलं होतं.
नवी दिल्ली : आपल्या हक्काच्या घराचं प्रत्येकाचं स्वप्न (Dream Home) असतं. नोकरी काळात भाडोत्री स्वरुपात किंवा सरकारी निवासात राहण्यास प्राधान्य देतात आणि निवृत्तीनंतर मिळालेल्या एकत्रित रकेमतून घराची खरेदी करतात. ऐंशी-नव्वदच्या दशकात दिसणारं चित्र आता पूर्णपणे बदललं आहे. सध्या वयाच्या तिशीच्या आत नवं घर खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गृह कर्जासाठी (HOME LOAN APPLICATION) अर्ज करणाऱ्यांनी सादर केलेल्या माहितीवरुन वयाची आकडेवारी समोर आली आहे. गृह कर्जाचं वितरण करणारी कंपनी अँड्रोमेडाचे (Andromeda) सीईओ राउल कपूर यांनी आकडेवारीसह गृहकर्ज घेणाऱ्यांचे वयाचं प्रमाण घटत असल्याचं म्हटलं आहे. दहा वर्षापूर्वी गृह कर्ज घेणाऱ्यांच्या वय सरासरी चाळीशीच्या घरात असायचं. पाच वर्षापूर्वी वयाचं प्रमाण 32-33 मध्ये पोहोचलं होतं. मात्र, सध्या वयाचं प्रमाण कमी होऊन 22 ते 23 वयोगटातील तरुण गृहकर्जासाठी पुढे येत आहेत.
तिशीत घर!
साधारणपणे 22-23 वय शिक्षणाचा किंवा नोकरी सुरू होण्याचा कालखंड मानला जातो. या वयात गृहकर्जासाठी प्रयत्न म्हणजे नोकरीसोबत घराचा श्रीगणेशा मानायला हवा. गृहकर्जासाठी कमी वयाच्या अर्जदारांच्या प्रश्नावर राऊल यांनी भाष्य केलं आहे. कमी वयात घरासाठी कर्ज घेण्याचे एकाधिक फायदे आहेत. गृह कर्जामुळे कर सवलतीत मोठ्या प्रमाणात बचत होते. तसेच ईएमआयच्या चक्रामुळं अनावश्यक खर्चाला कात्री लागते. त्यासोबत घराच्या स्वरुपात संपत्ती निर्माण होत असते.
कोविडचा धडा
कोविड प्रकोपाच्या काळात घराकडे बघण्याच्या अनेकांच्या दृष्टीकोनात निश्चिकपणे फरक पडला आहे. घराचं आकारमान छोटं पडत असल्याची जाणीव अनेकांना झाली. त्यामुळे गृहविस्ताराचं धोरण अनेकांनी स्विकारलं. तसेच सध्या केवळ घरच नव्हे तर त्यासोबत येणाऱ्या सुविधांचा देखील विचार केला जात असल्याचं दिसून येतं आहे. मुलांना खेळण्यासाठी पुरेशी जागा, स्विमिंग पूल आदी सुविधांच्या उपलब्धतेला पहिलं प्राधान्य दिलं जात.
गृहकर्ज घेताना काय लक्षात ठेवाल?
सध्या विविध बँकांचे गृहकर्जाचे पर्याय उपलब्ध आहेत. आपल्या आर्थिक क्षमतेनुसार कर्ज घेण्याचा नेहमी सल्ला दिला जातो. सोबतच अन्य शुल्क तपासण्याचे आवाहन देखील तज्ज्ञ करतात. त्यामुळे गृहकर्ज घेताना केवळ व्याजदराची माहिती न घेता अन्य प्रक्रिया शुल्क, दंडात्मक शुल्क यांची सर्वप्रकारची माहिती निश्चितपणे घ्यायला हवी.
इतर बातम्या :