आर्थिक अडचणीमध्ये गुंतवणुकीवर कर्ज घेणे कितपत फायदेशीर?; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

अचानक पैशांची गरज पडल्यानंतर अनेक जण क्रेडिट कार्ड किंवा अ‍ॅपचा वापर करून महागडे कर्ज घेतात. कर्जाची परतफेड करताना मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच कर्ज घेताना काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

आर्थिक अडचणीमध्ये गुंतवणुकीवर कर्ज घेणे कितपत फायदेशीर?; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 5:40 AM

नागपूरमधील एका कारखान्यात काम करणाऱ्या सुधीरने लॉकडाऊनकाळात (Lockdown) क्रेडिट कार्डाचा (Credit card) वापर करून 60 हजार रुपयांचे कर्ज घेतले. कोरोनाच्या विळख्यात सापडल्यानं कर्जाची परतफेड (Repayment) अद्याप करता आली नाही. व्याजावर व्याज आणि दंड यामुळे कर्ज लाख रुपयांपर्यंत पोहचलंय. ही गोष्ट फक्त सुधीर याच्यापर्यंतच मर्यादित नाही. अचानक पैशांची गरज पडल्यानंतर अनेक जण क्रेडिट कार्ड किंवा अ‍ॅपचा वापर करून महागडे कर्ज घेतात. कर्जाची परतफेड करताना मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. देशभरात वैयक्तिक म्हणजेच पर्सनल कर्जाची व्याप्ती वाढत आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार पर्सनल लोनचा आकडा 26 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचलाय. बँकांकडून होणाऱ्या कर्जवाटपात पर्सनल कर्जाचं प्रमाण 27.4 टक्के आहे. एका वर्षापूर्वी पर्सनल लोनचं प्रमाण 25 टक्के एवढं होतं. दिवसेंदिवस त्यामध्ये वाढच होत आहे.

विमा पॉलिसीवर कर्ज

गरज असताना कर्ज घेणं योग्य आहे. मात्र, कर्ज काढून तूप खाण्यात कोणताही शहाणपणा नाही. कर्ज घेण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसल्यास, स्वस्त कर्ज कुठं मिळतं याची माहिती घ्या, अनेक पर्याय उपलब्ध असल्यानं स्वस्त व्याजदरात कर्ज मिळू शकतं. अशा प्रकारचे कर्ज पर्सनल लोनपेक्षा स्वस्त असते. कर्ज मिळवण्यासाठी कोणते पर्याय आहेत पाहूयात. सर्वसाधारपणे अनेक जण जीवन विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करतात. या पॉलिसीवरही कर्ज मिळू शकतं. यासाठी तुम्ही विमा प्रतिनिधीशी संपर्क साधू शकता. विमा पॉलिसीवर काही दिवसात कर्ज मिळतं. तसेच विमा पॉलिसीवरील कर्जासाठी तुम्ही ऑनलाईन अर्जही करू शकता. पॉलिसीची किंमत आणि फंड किंमतीच्या आधारावर कर्ज मिळते. सर्वसाधारपणे विमा कंपन्या सरेंडर किमतीच्या आधारावर कर्ज देतात. सरेंडर किमतीच्या 85 टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळते. परंतु इथे एक लक्षात घ्या चाईड प्लॅन, मनी बॅक प्लॅन सारख्या पॉलिसीवर कर्ज मिळत नाही.

‘एफडी’वर कर्ज

पॉलिसीशिवाय एफडीवरही सहजपणे कर्ज मिळू शकते. एफडीचे कागदपत्र बँकेत जमा केल्यानंतर लगेच कर्ज मंजूर होते. एफडीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा एक टक्के जास्त व्याज दरानं कर्ज मिळते. याशिवाय ईपीएफ, पीपीएफ, एनएससी, किसान विकास पत्रावरही कर्ज घेता येते. पर्सनल लोनपेक्षा असे कर्ज खूप स्वस्त असतात. आपत्तीच्या काळात गुंतवणुकीवर कर्ज घेणं हा चांगला पर्याय आहे. असे कर्ज सुरक्षीत असल्यानं लवकर मिळते तसेच या कर्जापासून बँकेला उत्पन्नही मिळते. त्यामुळे कर्जाची प्रक्रिया सुलभ आहे. मात्र,असे कर्ज आपत्तकालिन परिस्थितीतच घ्यावे असा सल्ला आर्थिक सल्लागार प्रसाद सोळंकी यांनी दिलाय.

संबंधित बातम्या

Dell, MI, Samsung च्या उत्पादनांवर ग्राहकांचा विश्वास, विश्वसनीय ब्रँड्समध्ये Tata च्या 36 कंपन्या

PF Interest Rate : पीएफवरील व्याजदर चार दशकांच्या निच्चांकी पातळीवर; सहा कोटी कर्मचाऱ्यांना फटका

नव्या सरकारसमोर बिकट वाट; खर्च, कर्ज आणि वित्तीय तूट भरुन काढण्याचे आव्हान

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.